मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, निवडणूक आयोगाचा निर्णय

Aadhaar Voter ID Link | पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंगनंतर आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आता मतदानकार्ड हे आधार कार्डसोबत लिंक करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
मतदार नोंदणी क्रमांकसोबत आधार क्रमांक लिंक करण्यात येणार आहे. मतदानाचा अधिकार फक्त नागरिकांनाच आहे. EPIC ला आधारशी जोडण्यासाठी निवडणूक आयोगाकडून कलम 326, आरपी कायदा, 1950 आणि संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा आधार घेऊन कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा : मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वेमंत्री सकारात्मक
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोग लवकरच तज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहे. केंद्र सरकारकडून यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात येतील. याबाबत लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील. मतदारांना त्यांचे आधार कार्ड लिंक करण्यासाठी एक निश्चित कालावधी दिला जाईल, तसेच, ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही प्रक्रिया पार पडणार आहे.