ताज्या घडामोडीराष्ट्रिय

फातिमा शेख यांना जयंतीनिमित्त गुगलकडून अनोखे अभिवादन

नवी दिल्ली | सावित्रीबाई फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणाची क्रांतीज्योत पुढे नेणाऱ्या शिक्षिका आणि महिलांच्या न्याय, हक्कांसाठी लढणार्‍या फातिमा शेख यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी गुगलने आज खास डूडल साकारले आहे. आज डूडलवर झळकणार्‍या फातिमा शेख या पहिल्या मुस्लिम शिक्षिका होत्या.महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची कवाडे उघडणार्‍या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचा वसा फातिमा शेख यांनी पुढे चालवला. १८४८ साली दलित मुले आणि स्त्रियांसाठी पहिली शाळा त्यांनी सुरू केली. ९ जानेवारी १८३१ या दिवशी फातिमा शेख यांचा पुण्यात जन्म झाला होता. भाऊ उस्मान शेखसोबत त्या राहत होत्या. जात, धर्म, पंथ, लिंग या स्तरावर भेदाभेद करत ज्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला होता त्यांच्यासाठी शेख यांच्या घरी सावित्रीबाई आणि फातिमा शाळा घेत असत. सत्यशोधक चळवळीमध्ये ज्यांनी सहभाग घेतला अशा सार्‍यांनाच समाजातील उच्चभ्रू लोकांकडून हीन वागणूक देण्यात आली. मात्र अशा परिस्थितीतही घरोघरी जाऊन मुलींच्या कुटुंबाशी बोलून त्यांना शाळेत पाठवण्यासाठी फातिमा शेख स्वतः प्रयत्न करत होत्या. सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांना १० ऑक्टोबर १८५६ रोजी एक पत्र लिहिले होते. त्या पत्रामध्ये त्यांनी फातिमा शेख यांचा उल्लेख केल्याचे दिसून येते. सावित्रीबाई फुले यांनी स्वत:च्या तब्येतीविषयी जोतिबा फुले यांना पत्र लिहिले होते. या पत्रात सावित्रीबाई फुले यांनी ‘फातिमाला त्रास पडत असेल पण ती कुरकूर करणार नाही’, असे लिहिले होते.

महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची कवाडे उघडणार्‍या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचा वसा फातिमा शेख यांनी पुढे चालवला. १८४८ साली दलित मुले आणि स्त्रियांसाठी पहिली शाळा त्यांनी सुरू केली. ९ जानेवारी १८३१ या दिवशी फातिमा शेख यांचा पुण्यात जन्म झाला होता. भाऊ उस्मान शेखसोबत त्या राहत होत्या. जात, धर्म, पंथ, लिंग या स्तरावर भेदाभेद करत ज्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला होता त्यांच्यासाठी शेख यांच्या घरी सावित्रीबाई आणि फातिमा शाळा घेत असत. सत्यशोधक चळवळीमध्ये ज्यांनी सहभाग घेतला अशा सार्‍यांनाच समाजातील उच्चभ्रू लोकांकडून हीन वागणूक देण्यात आली. मात्र अशा परिस्थितीतही घरोघरी जाऊन मुलींच्या कुटुंबाशी बोलून त्यांना शाळेत पाठवण्यासाठी फातिमा शेख स्वतः प्रयत्न करत होत्या. सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांना १० ऑक्टोबर १८५६ रोजी एक पत्र लिहिले होते. त्या पत्रामध्ये त्यांनी फातिमा शेख यांचा उल्लेख केल्याचे दिसून येते. सावित्रीबाई फुले यांनी स्वत:च्या तब्येतीविषयी जोतिबा फुले यांना पत्र लिहिले होते. या पत्रात सावित्रीबाई फुले यांनी ‘फातिमाला त्रास पडत असेल पण ती कुरकूर करणार नाही’, असे लिहिले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button