Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशातील ‘ही’ आहेत टॉप-५ मॅनेजमेंट कॉलेज, प्लेसमेंटमध्ये मिळते करोडोंचे पॅकेज

Top 5 Management MBA College : उत्तीर्ण होताच चांगली नोकरी मिळेल अशी लाखो तरुणांची इच्छा असते. भारतात अनेक व्यवस्थापन संस्था आहेत ज्या एमबीए ऑफर करतात. यासोबतच या महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या तरुणांना कोट्यवधी रुपयांचे पॅकेजही मिळते. भारतातील टॉप-५ व्यवस्थापन महाविद्यालयांबद्दल जाणून घेऊया..

IIM अहमदाबाद :

तुम्हाला मॅनेजमेंटचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही IIM अहमदाबादमध्ये प्रवेश घेऊ शकता. हे कॉलेज गुजरातमध्ये आहे. NIRF रँकिंग २०२२ मध्ये ते प्रथम क्रमांकावर होते. येथे CAT म्हणजेच कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जातो.

IIM बंगळूर :

मॅनेजमेंट संस्थांमध्ये IIM बंगळूरचे स्थान दुसरे आहे. कॅट परीक्षा उत्तीर्ण करुन IIM, बंगळुरूमध्ये शिक्षण घ्यावे असे तरुणांचे स्वप्न असते. मात्र, येथे फक्त टॉप रँकर्सनाच प्रवेश मिळतो. येथे मॅनेजमेंट विषयातील पीएचडी शिकवली जाते.

हेही वाचा – औरंगजेबाच्या स्टेटसवरून विधानसभेत अबू आझमी आणि नितेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी

IIM कोलकाता :

तुम्हाला मॅनेजमेंटचा अभ्यास करायचा असेल तर IIM कोलकाता हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. येथून एमबीए किंवा पीएचडी केलेले तरुण व्यवसाय क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. इथेही फक्त टॉप रँकर्सनाच प्रवेश मिळतो.

IIM दिल्ली :

IIM दिल्ली हा तरुणांसाठीही उत्तम पर्याय ठरू शकतो. CAT परीक्षेत चांगले पर्सेंटाइल मिळाले असल्यास तुम्ही येथे प्रवेश घेऊ शकता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर येथील तरुणांना करोडो रुपयांचे पॅकेज मिळते.

IIM कोझिकोड :

IIM कोझिकोड हे केरळमध्ये वसले असून ते पाचव्या स्थानी आहे. येथे देखील कॅट परीक्षेत चांगले टक्केवारी मिळविणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जातो. तुम्हालाही येथे प्रवेश घ्यायचा असेल, तर ही संस्था तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button