breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

औरंगजेबाच्या स्टेटसवरून विधानसभेत अबू आझमी आणि नितेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी

मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात औरंगाजेबाचे स्टेटस लावण्यावरून गदारोळ पाहायला मिळाला. भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि आमदार नितेश राणे यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.

नितेश राणे म्हणाले की, धर्मवीर संभाजीराजेंविरोधात कटकारस्थान करणाऱ्या औरंगजेबाचं स्टेट्स ठेवून वातावरण खराब केलं जात आहे. पोलिसांनी या संदर्भात कारवाई केली आहे. वंदे मातरम म्हणत नाहीत, पण जेव्हा मिरवणूक काढली जाते तेव्हा औरंगजेब माझा बाप आहे, असं सांगणारे काही लोक आहेत. हे गद्दार लोक आहेत. हे मुद्दामबोलत असतात. औरंगजेब तुम्हारा बाप है म्हणतात. राज्यातील अनेक जिल्ह्यात हे सुरू आहे.

हेही वाचा – ‘World Cup २०२३ साठी ‘या’ दोन खेळाडूंची निवड न करणं म्हणजे सर्वात मोठा झटका’; माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

या लोकांना वंदे मातरम म्हणायचे नाहीये. जिल्ह्या जिल्ह्यात सर तन से जुदा अशा घोषणा द्यायच्या आहेत. त्यांना राज्याचं वातावरण खराब करायचं आहे. या लोकांना शिवरायांच्या महाराष्ट्रात राहायचा अधिकार नाही. अशा लोकांनी पाकिस्तानात निघून जावे ना. गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी. कशाला पाहिजे हे लोक? राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची आम्हाला चिंता आहे. विविध जिल्ह्यात स्टेट्स ठेवणारी ही मुलं आहेत. त्यांचा मास्टरमाइंड कोण याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमणार का? आपल्या विभागात काही लोक आहेत. हे लोक कारवाई करत नाहीत. त्यांची अंतर्गत चौकशी करणार का? असा सवाल नितेश राणे यांनी केला.

अबू आझमी नेमकं काय म्हणाले?

काही मुस्लिम तरुणांनी स्टेट्स ठेवला. त्यांच्यावर कारवाई केली. मी समजू शकतो. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरस्तानावर जाऊन तिथे फुले वाहिली. कुणात दम असेल तर माझ्यावर केस करून दाखवा, असं आव्हानच प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. एकाने स्टेट्स ठेवला म्हणून कारवाई केली जाते. दुसरा आव्हान देतो तरी काही होत नाही. या देशात दोन कायदे आहेत काय? ट्रेनमध्ये जी घटना घडली ती याच कारणाने झाली. द्वेष पसरवण्याचं काम सुरू आहे. मुस्लिमांना हिंदूंमध्ये बदनाम केलं जात आहे. देशभर हेच सुरू आहे. आता बुरखा घालून आणि दाढी वाढवून ट्रेनमधून प्रवास करणंही मुश्किल झालं आहे. आमची कौम ओरडत आहे. पण कोणीही मदत करत नाही. हे मला गद्दार म्हणतात. तेच गद्दार आहेत. नथुराम गोडसेचा फोटो लावला जाऊ शकतो. गांधीजींच्या मारेकऱ्याचा प्रचार केला जातो. हे जाणूनबुजून केलं जात आहे. देशाचं वातावरण खराब केलं जात आहे, असं अबू आझमी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button