Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्लाची मूर्ती विराजमान
![The idol of Ram Lalya sits in the core of the Ram temple in Ayodhya](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Ayodhya-Ram-Mandir-780x470.jpg)
Ayodhya Ram Mandir | येत्या २२ तारखेला राम मदिर उद्घाटन सोहळा पार पाडणार आहे. यावेळी प्रभू रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. १६ जानेवारीपासून विधी सुरू झाला आहे. प्राणप्रतिष्ठेपूर्वी मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती ठेवण्यात आली आहे.
राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू श्रीरामाची मूर्ती ठेवण्यात आल्यानंतर या मूर्तीचा फोटो समोर आला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीच्या कामात गुंतलेले सर्व कामगार मूर्ती ठेवण्यात आल्यानंतर हात जोडून प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा – MPSC Exam | राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
Take a look at idol of Lord Ram inside Ayodhya temple's sanctum sanctorum
Read @ANI Story | https://t.co/MSbha3ACQA#RamMandirPranPratishta #RamLalla #ayodhya pic.twitter.com/19PhJehGef
— ANI Digital (@ani_digital) January 18, 2024
कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिला येथे ही मूर्ती तयार केली आहे. मैसूरच्या प्रसिद्ध शिल्पकारांच्या पाच पिढ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले अरुण योगीराज सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकार आहेत. अरुण योगीराज यांनी यापूर्वी अनेक रेखीव मूर्ती आणि शिल्पं साकारली आहेत. अरुण यांच्या कामाचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलेलं आहे.