breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जम्मू -काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला, दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह दोन नागरिकांचा मृत्यू

श्रीगनर – जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा दहशत माजवायला सुरुवात केली आहे. आज सोपोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले असून दोन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी सोपोरमध्ये  अरमापोरा येथील नाक्याजवळ पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला केला. तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तसंच या हल्ल्यात इतर सहा जण जखमी झाल्याचं वृत्त समोर येतंय.

सोपोर येथील मंजूर अहमद शल्ला आणि बशीर अहमद या दोन नागरिकांचा मृत्यू झाला. दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी हे दोघंही रस्त्यावर चालत होते. या दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर ए तोयबाचा हात असल्याची माहिती काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी  दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button