Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकरांची मोर्चेबांधणी

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर विरोधी पक्षनेतेपदासाठी तीव्र इच्छुक आहेत.

महापालिका कारभाराचा अनुभव आणि महिला नगरसेविका म्हणून यावेळी पक्षाने संधी द्यावी, अशी मागणी डॉ. घोडेकर यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे, शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पेशाने डॉक्टर असलेल्या डॉ. घोडेकर विरोधी पक्षनेतेपदाला न्याय देतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, गेल्या चार वर्षांमध्ये राष्ट्रवादीकडून प्रथम योगेश बहल, दत्ता साने त्यानंतर नाना काटे यांना विरोधी पक्षनेतेपदी काम करण्याची संधी दिली. मात्र, महापालिकेत स्त्रीयांना 50 टक्के आरक्षण असताना राष्ट्रवादीकडून एकाही महिला नगरसेविकेला विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे महिला म्हणून पक्षाचे नेते अजित पवार विचार करीत, असे घोडकेकर समर्थकांचे म्हणणे आहे.

माळी समाजाला संधी कधी?

दरम्यान, विरोधी पक्षनेतापदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माळी समाजाला प्राधान्य दिले नाही, असा सूर आहे. शहरात माळी समाज हा बहुसंख्य आहे. डॉ. वैशाली घोडेकर या माळी समाजातून आहेत. आगामी महापालिका निवडणुकांत मतांचे गणीत बांधताना माळी समाजाला गृहित धरणे, राष्ट्रवादीला परवडणारे नाही, असे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button