ताज्या घडामोडीविदर्भ विभाग

क्रीडा संकुल नसल्याने पंढरीतील खेळाडूंची मोठी गैरसोय

पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील खेळाडूंचे राज्य आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यश

पंढरपूर : पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये राज्यच नव्हे तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये मोठे यश प्राप्त केले आहे. मात्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी अत्यावश्यक असलेला सराव करण्यासाठी सर्व सुविधांनी सज्ज असे एकही क्रीडा संकुल नसल्याने पंढरीतील खेळाडूंची मोठी गैरसोय होत आहे.

पंढरपूर शहरामध्ये मंगळवेढा रस्त्यालगतच्या जागेमध्ये राज्य शासनाचे क्रीडा अधिकारी कार्यालय, एक बॅडमिंटन हॉल व त्यालगत पंढरपूर नगरपालिकेच्या मालकीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान उपलब्ध आहे. याशिवाय शासन स्तरावर खेळाडूंसाठी पंढरपूर मध्ये कोणतीही क्रीडा सुविधा उपलब्ध नाही. राज्य सरकारने प्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुल देण्याचे धोरण आखले आहे. मात्र पंढरपूरमध्ये अद्यापही क्रीडा संकुल उभारण्यात आलेले नाही. दरम्यान राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे हे नुकतेच पंढरपूर दौऱ्यावर आले असताना पंढरीतील क्रीडा संकुल बाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, पंढरपूर मध्ये क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव आला तर आपण योग्य ती मदत करण्यास तत्पर आहोत.

हेही वाचा –  महापालिका उभारणार पाच काेटींची ‘क्लायम्बिंग वॉल’

पंढरपूर मधील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात मध्ये राज्यच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केले आहे. या खेळाडूंना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यश प्राप्त करण्याकरता सर्व सुविधांनी युक्त अद्ययावत असे क्रीडा संकुल उभारणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. असे मत येथील ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक प्रा.सुभाष मस्के यांनी ‘सकाळ’ शी बोलताना व्यक्त केले. दरम्यान पंढरीतील क्रीडा संकुला बाबत माहिती घेण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्याशी संपर्क व संदेश केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारांमध्ये यश प्राप्त केलेले पंढरपूर मधील खेळाडू: श्रीराम थिटे (डेकॅथलॉन) ३९ वी राष्ट्रीय ज्युनियर अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२४ भुवनेश्वर, प्रणिता जाधवर (ट्रिपल जंप) ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी २०२४, कोमल जगदाळे (स्टीपलचेस) राष्ट्रीय फेडरेशन कप, कोया स्टेडियम २०२२, राहुल बाली धोत्रे (भाला) १८ वी राष्ट्रीय युवा अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२३

कर्नाटक, साक्षी संगप्पा सरगर

(स्टीपलचेस) ३७ वी राष्ट्रीय ज्युनियर अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा, गुवाहाटी २०२२, श्रद्धा भरत हाके (स्टीपलचेस) ३७ वी राष्ट्रीय ज्युनियर अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा गुवाहाटी २०२२, संतोषी देशमुख (डिस्कस थ्रो), स्नेहा अंधारे (डिस्कस थ्रो), राहुल धोत्रे (भालाफेक), प्रताप लवटे (रिले) पंढरीतील अनेक ॲथलेटिक्स खेळाडूंनी राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर मोठे यश प्राप्त केले आहे. या खेळाडूंना सराव करण्यासाठी सिंथेटिक ट्रॅकची गरज असते. ते पंढरपूर मध्ये उपलब्ध नसल्यामुळे विजापूर किंवा पुणे येथे सरावासाठी जावे लागते. तरी पंढरपूर मधील खेळाडूंसाठी सर्व क्रीडा प्रकारांचे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात यावे अशी आमची अनेक वर्षांपासून मागणी आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

प्रा. सुभाष मस्के, ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक, पंढरपूर

पंढरपूर मधील क्रीडा संकुलासाठी किमान सात ते दहा एकर जमीन आवश्यक आहे. त्यासाठी पंढरपूरचे मा. तहसीलदार साहेब यांच्याशी चर्चा झाली असून जमिनी बाबत कार्यवाही सुरू आहे.

सुप्रिया गाढवे, प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी, पंढरपूर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button