स्पेस एक्सची अंतराळ सफर यशस्वी; फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर लँडिंग
![Space X's space voyage a success; Landing on the shores of Florida](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/2space_ECM.jpg)
एलन मस्क यांच्या स्पसेएक्स कंपनीने महत्त्वाचा पल्ला गाठला आहे. स्पेस एक्सच्या फाल्कन ९ रॉकेटने १५ सप्टेंबर रोजी फ्लोरिडाच्या केनडी स्पेस सेंटरमधुन चार पर्यटकांना घेऊन अवकाशाच्या दिशेने यशस्वी झेप घेतली होती. त्या सर्वजणांनी फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर सुरक्षित लँडिंग केलं आहे. भारतीय वेळेनुसार सुमारे ४:३० वाजता या पॅरॅशूटच्या सहाय्याने अटलांटिक समूद्रात लॅंडिग केलं आहे.
#WATCH | After orbiting Earth for 3 days, four astronauts of Inspiration4 flying aboard SpaceX’s Dragon spacecraft safely splashed down in Atlantic Ocean off coast Florida, US today, marking the completion of world’s first all-civilian human spaceflight to orbit
(Video: SpaceX) pic.twitter.com/HNeuHq3b2t
— ANI (@ANI) September 18, 2021
अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापर्यंत पोचविणे, तेथून पृथ्वीवर यानाद्वारे सुखरूप आणण्यात यशस्वी ठरलेली एलन मस्क यांची ‘स्पेसएक्स’ कंपनीने नवा इतिहास रचला आहे. कंपनीतर्फे अंतराळवीर नाही तर सामान्य नागरिकांना अंतराळात पाठविण्यात आले असून, ते यशस्वीरित्या परतले आहेत. ‘इन्स्पिरेशन -४’ या मोहिमेद्वारे अंतराळ पर्यटनास यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. यातून चार जणांना अंतराळाची सैर करण्याची संधी मिळाली असून, फ्लोरिडाच्या केनडी स्पेस रिसर्च सेंटर येथून स्पेसएक्सचे यान चौघांना घेऊन अवकाशात भरारी घेतली होती. ते सर्व जण आपली अवकाश यात्रा पूर्ण करून परतले आहेत.