ताज्या घडामोडीविदर्भ विभाग

सोलापुरात संत तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांची भेट

वरुणराजाच्या साक्षीने संत भेटीचा सोहळा

सोलापूर : धन्य काळ संत भेटी । पायीं मिठी पडिली तो ॥

संदेहाची सुटली गांठी । झालो पोटीं शीतळ ॥

भवनदीचा जाला तारा । या उत्तरा प्रसादें ॥

तुका म्हणे मंगळ आतां । कोण दाता याहुनि ॥

आज पालखी मार्गावरील बोंडले (ता. माळशिरस) येथे वरुणराजाच्या साक्षीने जगद्‌गुरू तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांच्या भेटीचा अनोखा सोहळा रंगला. लक्ष लक्ष नयनांनी हा सोहळा पाहताना वारकऱ्यांच्या ‘माउली माउली’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज बोरगाव मुक्काम आटोपून दुपारच्या विसाव्यासाठी तर संत सोपानदेव महाराज यांचा पालखी सोहळा येथील मुक्काम आटोपून पुढील वाटचालीस निघताना बोंडले चौकात हा भेटीचा सोहळा पार पडला. यावेळी दोन्ही पालखी सोहळ्यातील पालखी प्रमुखांनी दोन्ही संतांच्या पालख्यांचे रथ जवळ घेत एकमेकांना श्रीफळ देऊन गळाभेट घेतली.

हेही वाचा – ‘आलमट्टी धरण उंचीवाढीला विरोधाची महाराष्ट्राची भूमिका ठामपणे मांडणार’; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

या सोहळ्यातील दृश्य पाहून जमलेल्या भाविकांची धन्य झालो असल्याची भावना होती. यानंतर संत सोपानदेव महाराजांचा पालखी सोहळा पुढील भंडीशेगाव मुक्कामी रवाना झाला. तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बोंडले चौकात दुपारच्या विसाव्यासाठी थांबला गेला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button