कत्तलीसाठी नेण्यात येणारे गोवंश स्थानिक नागरीकांनी पकडले
गोवंश घेऊन जाणाऱ्या गाडीची संतप्त नागरीकांकडून तोडफोड

नाशिक : कत्तलीसाठी नेण्यात येणारे गोवंश स्थानिक नागरीकांनी पकडले आहेत. नाशिकच्या सैयद पिंप्री गावातील घटना. गोरक्षकांच्या मदतीने पहाटेच्या सुमारास कत्तलीसाठी नेणारे गोवंश पकडण्यात आले. कत्तल केलेलं एक गोवंश चारचाकी गाडीतून घेऊन जाताना स्थानिक नागरिकांनी पडकले. कत्तलीसाठी नेणाऱ्या गाईची मुक्ततता करण्यात आली. गावात अनेक वर्षांपासून अनधिकृत कत्तलखाना सुरू आहे. याविषयी पोलिसांना माहिती देऊन ही ग्रामीण पोलीसांनी काहीच कारवाई केली नसल्यानं नागरिक संतप्त. गोवंश घेऊन जाणाऱ्या गाडीची संतप्त नागरीकांनी केली तोडफोड. ग्रामीण पोलिसांच्या निष्क्रियतेवर नागरिकांची नाराजी व्यक्त केली.
पीओपी मुर्तीना नाशिक शहरात बंदी
पीओपी मुर्तीना नाशिक शहरात नो एंट्री करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेने पूर्वतयारी म्हणून मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. पीओपी पासून तयार करण्यात येणाऱ्या मूर्तीची निर्मिती, साठा, विक्री, तसेच विसर्जनावर बंदी आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्ती विर्सजनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे केली प्रसिद्ध. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार महापालिकेची सूचना.
हेही वाचा : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकमध्ये काय उपाययोजना करता येतील याचा अभ्यास
नाशिकच्या अधिकाऱ्यांच्या पथकाकडून रेल्वेच्या गर्दी व्यवस्थापनाचा अभ्यास. प्रयागराज कुंभमेळा अभ्यास दौरा पाहणीसाठी गेलेले पथक. रेल्वे स्थानकावर गर्दी व्यवस्थापनासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा अभ्यास. रेल्वे विभागाचे गर्दी व्यवस्थापन, स्थानिक प्रशासनाशी समन्वय, पर्यटन वाढीसाठी केलेले नियोजन तसेच कलाग्राम आणि इतर पर्यटन स्थळांची पाहणी केली. प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकमध्ये काय उपाययोजना करता येतील याचा अभ्यास.
नाशिकमध्ये दिवसा पारा वाढला
नाशिकमध्ये दिवसा पारा वाढला. उष्णतेच्या झळा, रात्री गारवा. बदललेल्या वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात उन्हाच्या झळा जाणवण्यास सुरुवात. रात्री आणि सकाळच्या सुमारास गारवा, मात्र दिवसभर उष्णतेच्या झळा. बदललेल्या वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली लहानग्यांना थंडी, तापाचा त्रास. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता.
वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती. नाशिक मनपा समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून राबविणार योजना. योजनेसाठी महापालिकेच्या 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात तरतूद. अनेक मागासवर्गीय घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार. मनपाच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून मागासवर्गीय, महिला व बालके, तसेच दिव्यांग यांच्याकरिता विविध कल्याणकारी योजना.