अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

देहमनाने व्हावे रामार्पण।

भगवंताची उपासना । दूर करी सर्व यातना ॥ चित्ताची स्थिरता । भगवंताच्या उपासनेत निश्चितता ॥ देह जरी जीर्ण फार । तरी वासनेचा जोर अनिवार । हे जाणून चित्ती । एक भजावा रघुपति॥

हृदयी करता भगवंताचे ध्यान । नामाविण उच्चार दुजा न जाण । त्यात व्यवहाराचे जतन । न दुखवावे कोणाचे अंत:करण । असा नेम ज्याच्यापाशी । राम तेथील रहिवाशी ॥

मी रामाचा, रामा तू माझा । हाच अखंड असावा हव्यास ॥ ऐसे ध्यावे रामाला । की जे जीव प्यार झाले मला ॥ आता याहून दुजे न सांगणे काही । रामाविण जगू नाही॥

जे जे होणार ते होतच जाते । ते भगवंताच्या इच्छेने घडते । ऐसे आणणे मना। याचे नाव उपासना ॥ अखंड रामसेवा ज्याला लाभली । धन्य धन्य त्याची माउली॥

स्वार्थरहित रामसेवा । याहून लाभ दुजा न जीवा ॥ राम ठेवा मनी । तो ध्यात जावा मानसपूजनी ॥ वाचेने भगवंताचे नाव । कायेने भगवंताची सेवा । चित्ती भगवंताचे ध्यान । आपण राहावे रामार्पण । याहून अन्य सेवा कोणतीहि न जाण ॥

हेही वाचा –  एकनाथ शिंदेंचं वक्तव्य; “कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं ते कापावं लागतं, पाकिस्तानला….”

उपासना असावी बळकट । तेथे नसावी कशाची अट॥ उपासनेचा असावा जोर । ज्याने होईल मन स्थिर॥ आपले जीवन ज्याचे हाती । त्याची नेहमी ठेवावी संगति॥

जे जे काही मी करावे । त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे॥ मनी न सोडावा धीर । आहे म्हणावे माझा रघुवीर॥ करावे भगवंताचे चिंतन । होईल स्वत:चे विस्मरण॥

सर्व आहे रामाधीन । आपण निमित्ताला कारण ॥ रामावर ठेवावे चित्त । जैसे प्रपंची असावे वाटते वित्त॥ उपासनेचे नर । त्यांनी राहावे खबरदार ॥ आजवर केली भगवंताची उपासना । पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा॥

सर्वांचे ऐकावे । परी उपासनेपासून दूर न व्हावे । राम माझा देता घेता । राम माझ्या भोवता ॥ रामाविण जगी दुजे । न ठेवावे आणिक परते ॥ एक सद‍्गुरुआज्ञा प्रमाण । हीच रामसेवा जाण ॥

थोर थोर ऋषिमुनि । यति संत साधु यांनी । एकच केले खास । रामावाचून न राहू दिले जीवास ॥ ठेवावा रामावर पूर्ण विश्वास । न करावे उपासतापास ॥

उपासनेत राहावे आपण । हेच रामाचे सान्निध्य जाण॥ स्वार्थरहित सेवा । तीच पावे देवाधिदेवा ॥ जे जे होते काही । ते ते राम करतो पाही । हा एकच विश्वास । समाधानाचा मार्ग सत्य खास ॥

जेथे परमात्म्याची सत्ता । तेथे न चाले कोणाचे सर्वथा । म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये । समाधान राखीत जावे ॥

बोधवचन:- चित्ती भगवंताचे ध्यान। आपण राहावे रामार्पण। याहून अन्य सेवा कोणतीहि न जाण॥

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button