हिमाचलमध्ये भूस्खलन! शिव मंदिर ढासळले, २१ भाविकांचा मृत्यू, आणखी काही जण अडकल्याची भिती
![Shiv temple collapses in Himachal, 21 devotees dead, many more feared trapped](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Shimla-Shiv-Temple-Landslide-780x470.png)
Shimla Shiv Temple Landslide : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. या दोन्ही जिल्ह्यांत ढगफुटी सदृश्य चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे भुस्खलना आणि दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत. शिमला येथील भुस्खलन झाल्याने शिव मंदिर ढासळले आहे. या दुर्घटनेत २१ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली आणखी ५० जण अडकल्याचं म्हटलं जात आहे.
शिमला येथील समरहिलमध्ये भुस्खलन झालं. त्यामुळे शिव मंदिर ढासळलं आहे. सकाळी या मंदिरात काही लोक पूजा करण्यासाठी आले होते. अचानक मंदिर ढासळल्याने २० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, यटा ठिकाणाहून २१ मृतदेह बाहेर काढल्याने मंदिराच्या ढिगाऱ्याखाली अधिक लोक दबल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
हेही वाचा – शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर राज ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले..
WATCH | Shimla's Summer Hill area hit by landslide; few people feared dead, operation underway to rescue stranded persons
CM Sukhvinder Singh Sukhu and state minister Vikramaditya Singh are on present on the spot pic.twitter.com/sjTLSG3qNB
— ANI (@ANI) August 14, 2023
दरम्यान, हवामान खात्याने डेहराडून आणि नैनितालसह उत्तराखंडमधील सहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर उत्तराखंडमध्ये १६ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच हरिद्वार जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.