breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर राज ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले..

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गुप्त भेट झाली. या भेटीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. यामुळे आता जयंत पाटील हे सत्तेत सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, सरकार काय, पत्रकारितेतही कन्फ्युजनच आहे. कोण कुणाचा आहे हेच कळत नाही हल्ली. उलटा फिरला की लेबल कळतं मागे लागलेलं. कोणत्या पक्षाचा आहे ते. त्यामुळे सगळीकडेच कन्फ्युजन आहे. बघू.. दूर होईल लवकरात लवकर.

हेही वाचा – ‘OMG २’ चित्रपटावरून शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत; म्हणाले..

अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर राज ठाकरे म्हणाले, माझं ऐकत नाही तुम्ही. मी सांगितलं होतं ना तेव्हा? हे त्यांचंच स्वत:चं आहे. त्यांनी एक टीम आधी पाठवली. आता दुसरी जाईल. हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत. हे आज नाही, २०१४ पासून मिळाले आहेत. पहाटेचा शपथविधी तुम्हाला आठवत नाही का? शरद पवार आणि अजित पवार यांना भेटायची जागा चोरडिया या नावाच्या व्यक्तीकडे मिळाली ही देखील कमाल आहे, असा मिश्किल टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button