शक्तिकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव पदी झाली नियुक्ती

Shaktikanta Das : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरात कॅडरचे निवृत्त IAS अधिकारी पी. के. मिश्रा सध्या पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. 11 सप्टेंबर 2019 पासून ते या पदावर कार्यरत होते.
दास यांचा कार्यकाळ पंतप्रधानांच्या कार्यकाळापर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत राहणार आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने शक्तिकांत दास यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव – 2 म्हणून नियुक्त करण्यास मंजुरी दिली आहे.
शक्तिकांत दास कोण आहेत?
शक्तिकांत दास यांचा जन्म 1957 मध्ये ओडिशामध्ये झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहास विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, त्यांनी बर्मिंघम विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासन (Public Administration) विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली.
हेही वाचा – ‘सीआरसीएस’चे देशातील पहिले क्षेत्रीय कार्यालय पुण्यात सुरू केले जाईल’; केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा
ते 1980 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) दाखल झाले आणि तमिळनाडू कॅडरमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहिले. त्यानंतर, त्यांनी केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून सेवा दिली.
शक्तिकांत दास हे RBI चे 25वे गव्हर्नर देखील राहिले आहेत. त्यांचा कार्यकाळ डिसेंबर 20218 ते डिसेंबर 2024 असा 6 वर्ष होता. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. दास यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नोटबंदी आणि GST सारख्या सुधारणांमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आले आहे.
शक्तिकांत दास यांच्या कार्यकाळातच कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनचा भारतीय अर्थव्यवस्थेला सामना करावा लागला होता. यावेळी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना केल्या. त्यांनी IBC (इनसॉल्व्हन्सी अँड बँकक्रप्सी कोड), सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण यांसारखे महत्त्वाचे आर्थिक सुधार यशस्वीपणे लागू केले. GST च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यांमध्ये समन्वय साधण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.