ताज्या घडामोडीविदर्भ विभाग

संतोष देशमुख निर्घृण हत्याकांडानंतर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी यंदाची होळी साजरी केली नाही

संतोष देशमुख हत्येतील सर्व आरोपींनी फाशी द्या, तोपर्यंत एकही सण साजरा न करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

बीड : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी दहा डिसेंबर रोजी अपहरणानंतर हत्या करण्यात आली होती. या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या हत्याकांडानंतर महाराष्ट्राची वाट आता बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने होऊ लागली आहे. आता मस्साजोग ग्रामस्थांनी यंदाचा होळी सण साजरा केला नाही. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत कोणताही सण साजरा करणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी १० डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. या हत्याकांडाची सुई मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते वाल्मीक कराड यांच्या दिशेने वळली होती. त्यानंतर या प्रकरणात ९ ते १० आरोपींना अटक करण्यात आली होती. वाल्मीक कराड या प्रकरणात पुणे सीआयडीच्या कार्यालयात हजर झाला. त्यानंतर या सर्व आरोपींना मोक्का लावण्यात आला.

हेही वाचा –  दूध दरात दोन रुपयांनी वाढ; जाणून घ्या, दरवाढ का आणि कधीपासून

या प्रकरणात सुरुवातीपासूनच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखर अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर संतोष देशमुख यांच्या हत्येचे आठ व्हिडीओ आणि १५ फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या फोटोत ही हत्या किची निर्घृण आणि क्रुरतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

संतोष देशमुख यांच्या मृतदेहांची अक्षरश: विटंबना करतानाचे फोटो काढण्यात आले होते. हा फोटो व्हायलर करण्यात आले. त्यामुळे संतापाचा उद्रेक उडाला. या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला उभारला गेला आहे. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात मस्साजोगमध्ये यंदा होळी आणि धुळवड साजरी न करण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला आहे. इतकेच या पुढे जोपपर्यंत सर्व आरोपींना फाशी होत नाही तर मस्साजोगमध्ये कोणताच सण साजरा न करण्याची शपथ ग्रामस्थांनी घेतली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button