सुरक्षित हवाई कंपन्यात एकाही भारतीय विमान कंपनीचा समावेश नाही
लो कॉस्ट एअरलाईनच्या यादीत भारताच्या सर्वात मोठ्या इंडिगो कंपनीचे नाव १९ व्या क्रमांकावर

राष्ट्रीय : जगातील सर्वात सुरक्षित हवाई कंपनीत एकाही भारतीय विमान कंपनीचे नाव नसल्याचे उघड झाले आहे. दरवर्षी एअरलाईन एक्सपर्टची टीम जगातील ४०० एअरलाईनच्या सुरक्षेची तपासणी करतात. गेल्या दोन वर्षात झालेले विमान अपघात, एकूण अपघाताची संख्या, सरकारी अहवाल, विमानांचे आयुष्य आणि संख्या, पायलट प्रशिक्षणाचा दर्जा आणि एअरलाईनची आर्थिक स्थिती असे अनेक मापदंड तपासून त्याआधारे मुल्यांकन करतात. त्यानंतर सुरक्षेच्या बाबतीत एअरलाईन कोणत्या क्रमांकावर आहे याची आकडेवारी जाहीर केली जाते. अशाच प्रकारे जगातील सर्वात सुरक्षित हवाई कंपन्याची यादी जाहीर केलेली आहे. यात एकाही भारतीय हवाई कंपनीचे नाव नाही.त्यामुळे विमानप्रवासात भारतीय प्रवासी किती सुरक्षित आहे असा सवाल केला जात आहे. लो कॉस्ट एअरलाईनच्या यादीत मात्र भारताच्या सर्वात मोठ्या इंडिगो कंपनीचे नाव १९ व्या क्रमांकावर आले आहे.
अमेरिकन एयरलाइन्सचा दबदबा
या वर्षी टॉप २४ सर्वात सुरक्षित एअरलाईन्समध्ये अमेरिकेतील पाच एअरलाईन्स कंपन्यांचा समावेश झाला आहे. यात फ्रंटिअर (५ वा क्रमांक ), साऊथवेस्ट (९ वा क्रमांक ), सन कंट्री (१५ वा क्रमांक ), जेटब्लू (१७ वा क्रमांक ) आणि एलीजेंट एअर (२१ वा क्रमांक ) यांचा समावेश आहे.
हेही वाचा – शंभर थकबाकीदारांकडे 334 कोटींचा कर थकीत
एलीजेंट एअर 2024 साली यादीच्या बाहेर होती. परंतू या वर्षी तिचा समावेश केला आहे. स्पिरिट एअरलाईन्स ( Spirit Airlines ), ही कंपनी अनेक वर्षे यादीत होती तिला 2025 च्या रँकिंगमधून बाहर केले आहे. अलिकडेच या कंपनीची दिवाळखोरी जाहीर झाल्याने असा निर्णय घेतला आहे.
एअरलाईन्सची सुरक्षा रॅकिंग कशी ठरते…
दरवर्षी ४०० एअरलाईन्सचे विश्लेषण करुन त्यांच्या सुरक्षेच्या विविध मानकांची तपासणी करते. या तपासणीत गेल्या दोन वर्षात झालेल्या मोठे अपघात, एकूण घटनांची वारंवारीता, अलिकडचे अपघात, विमानांचे आयुर्मान, ऑडिट आणि विमानांची एकूण संख्या, पायलट प्रशिक्षणाचा दर्जात आणि वित्तीय स्थिती याचा विचार करुन रेटींग देत असते.
आर्थिक अस्थिरता महत्वाची
कोणत्याही कंपनीतील आर्थिक अस्थिरता एअरलाइनसाठी गंभीर ऑपरेशनल आव्हाने निर्माण करू शकते, ज्यामुळे तिच्या सुरक्षा क्रमवारीवर देखील परिणाम होऊ शकतो. यामुळेच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या विमान कंपन्यांना या यादीत स्थान मिळत नाही असे एअरलाइन रेटिंग्जचे सीईओ शेरोन पीटरसन यांनी सांगितले.बहुतांशी भारतीय विमान कंपन्या आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांचा या यादीत समावेश केलेला नसावा असे म्हटले जात आहे.