कर्जाचा EMI कमी होणार! RBI कडून रेपोदरात कपात
![RBI cuts repo rate by 25 bps to 6.25% in first policy review under Governor Sanjay Malhotra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/RBI-cuts-repo-rate-by-25-bps-to-6.25-in-first-policy-review-under-Governor-Sanjay-Malhotra-780x470.jpg)
RBI | RBI ने तब्बल पाच वर्षानंतर रेपो दरात कपातीचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय मोनेटरी पॉलिसी कमिटी अर्थात सीपीसीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आरबीआयने २५ बेसिस पॉइंटने व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे आता व्याजदर ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आरबीय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी नुकतीच या निर्णयाची घोषणा केली.
RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले, गेल्या काही वर्षांत या पद्धतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला आहे. विशेषत: करोना काळातील आव्हानांचा भारतीय अर्थव्यवस्थेला सामना करता आला आहे. यानंतर सरासरी महागाईचा दर कमी झाला आहे. व्याजदरासंदर्भातील या धोरणाचा अवलंब केल्यानंतर आरबीआयकडून नियोजित पद्धतीनेच मार्गक्रमण करण्यात आलं.
हेही वाचा : ग्राहकांना पुन्हा झटका? जाणून घ्या सोने व चांदीचे दर..
https://x.com/ani_digital/status/1887727800016072786
दरम्यान, RBI च्या MPC बैठकीतील चर्चेनंतर देशाचा आर्थिक विकासदर ६.७ टक्के इतका अंदाजित करण्यात आला आहे. त्याशिवाय, घाऊक बाजारपेठेतील महागाईचा दर हा ४.२ टकक्यांच्या आसपास राहील, असं गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केलं आहे.