ग्राहकांना पुन्हा झटका? जाणून घ्या सोने व चांदीचे दर..

Gold Silver Rate Today | २०२५ सुरु होताच सोने आणि चांदीने नवनवीन विक्रम नावावर नोंदवले आहेत. कारण या दोन्ही धातुनी उच्चांकी झेप घेतली आहे. अशातच गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दराने मोठी मजल मारली. तर चांदीने नरमाईनंतर पुन्हा एकदा झेप घेतली. तर आज पाहुयात सोने व चांदीचे दर काय आहेत..
सोमवारी सोने ४४० रुपयांनी स्वस्त झाले होते. मंगळवारी ११५ रुपयांनी आणि बुधवारी १०४० रुपयांनी सोने वधारले. तर गुरुवारी त्यात २५० रुपयांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट सोने ७९,४५० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ८६,६६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
हेही वाचा : आपच्या १६ उमेदवारांना १५ कोटींची ऑफर; केजरीवाल यांचा ट्विट करत भाजपवर गंभीर आरोप
गेल्या महिन्यात चांदीत चढउताराचे सत्र दिसून आले. तर या महिन्याच्या सुरुवातीला चांदीला सूर गवसला नही. ४ फेब्रुवारी रोजी चांदी १ हजार रुपयांनी उतरली. तर बुधवारी चांदी हजारांनी वधारली. काल भाव स्थिर होता. गेल्या महिन्यात चांदीत चढउताराचे सत्र दिसून आले. अशातच गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ९९,५०० रुपये इतका आहे.