Breaking-newsताज्या घडामोडी
रायगड किल्ल्यावरील तिकिटघर शिवभक्ताकडून क्लोज
![Rayagad Killyavaril Tikitghar Shivbhaktakadoon Close](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/raygad-killa.jpg)
रायगड | प्रतिनिधी
कराच्या नावे जबरदस्ती पैशांची लूट केली जात असल्याचा आरोप करत रायगड किल्ल्यावरील तिकीटघराचा शिवभक्तांनी कडेलोट केला आहे. पुरातत्व विभागाची तिकीट खिडकी शिवभक्तांनी हटवली आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोषदेखील करण्यात आला.
या वेळी शिवसैनिक आणि महाडचे आमदार भरत गोगावले उपस्थित होते.
रायगडाच्या चित्त दरवाजा जवळ पुरातत्व विभागाने तिकीट घर उभारले होते. पुरातत्व विभागाकडून करवसुली करण्यात येत होती. रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना २५ रुपये मोजावे लागत होते. मात्र कर भरुनही गडावर कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने शिवभक्त संतापले. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शिवभक्त आणि शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. तिकीटघराची तोडफोड करत दरीत ढकलून देण्यात आली.