Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय!

5th and 8th Standard Passing | पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट समोर येत आहे. नापास झाल्याने विद्यार्थी नैरश्यात जातात. यामुळे मागील काही वर्षापूर्वी शालेय शिक्षणात नापास न करता पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता या नियमात बदल करण्यात आला आहे.

कारण आता पाचवी, आठवीला नापास झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणातील परीक्षा हलक्यात घेऊन चालणार नाही. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेत ‘नो डिटेन्शन पॉलिसी’ रद्द केली आहे.म्हणजे आता तुम्ही नापास झाले तरी देखील तुम्हाला त्याचा वर्गात बसावे लागणार आहे.

हेही वाचा     –      ‘बीडमध्ये गॅग्ज ऑफ वासेपूर सुरू आहे’; आमदार सुरेश धस 

नापास झाल्यास सरकार ने दिला हा मार्ग :

आता कोणताही विद्यार्थी नापास झाल्यास त्याला पुढील 2 महिन्यांत पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. परंतु ते पुन्हा अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना सरसकट पुढच्या वर्गात पाठवले जाणार नाही, असेही केंद्रीय शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

शाळा आठवीपर्यंत विद्यार्थ्याला बाहेर काढणार नाही. मुलांमधील शिक्षणाचा परिणाम सुधारण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button