Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंतप्रधानांच्या हस्ते ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षानिमित्त समारंभाचे उदघाटन ; टपाल तिकिट अन् नाणे प्रकाशित

Vande Matram :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनाच्या वर्षभराच्या समारंभाचे उद्घाटन केले. या निमित्ताने त्यांनी एक स्मारक टपाल तिकिट आणि नाणे देखील प्रकाशित केले. हा कार्यक्रम आजपासून ते ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वर्षभर चालणार आहे. या कालातीत रचनेमुळे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा मिळाली आणि राष्ट्रीय अभिमान आणि एकता कायम राहिली.

दरम्यान ,  या अगोदर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आपण वंदे मातरम या गीताचा गौरवशाली १५० वा वर्धापन दिन साजरा करणार आहोत.”असे म्हटले होते.तसेच ही एक प्रेरणादायी हाक आहे जी देशाच्या पिढ्यांना देशभक्तीची भावना जागृत करत आहे.

हेही वाचा –  ‘भाजपची पूर्ण ताकदीने निवडणूक लढण्याची तयारी’; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रसंगी एक स्मारक टपाल तिकिट आणि नाणे देखील प्रकाशित केले. मुख्य कार्यक्रमासोबतच, ‘वंदे मातरम्’ची संपूर्ण आवृत्ती सार्वजनिक ठिकाणी सकाळी ९:५० वाजता सामूहिकपणे गायले गेले. ज्यामध्ये समाजातील सर्व घटकातील नागरिकांचा सहभाग होता.

या वर्षी ‘वंदे मातरम्’ या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाली. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी अक्षय नवमीच्या दिवशी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत रचले. चॅटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीचा भाग म्हणून ‘वंदे मातरम्’ हे प्रथम साहित्यिक मासिक बंगदर्शनमध्ये प्रकाशित झाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button