ताज्या घडामोडीराष्ट्रिय

पाकिस्तानवर हवाई हल्ला, जैशचे सुमारे 50 दहशतवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती

9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त, भारताची मोठी कारवाई, पाकिस्तानने घेतला धसका...

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याकडून जशास तसं उत्तर देण्यात आलं आहे. भारताकडून बुधवारी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.यामध्ये जैशचे सुमारे 50 दहशतवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भारतीय सैन्याच्या या हल्ल्यामुळे पाकिस्तान हदरले आहे. पाकिस्तानने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. भारताकडून सर्व मित्रदेशांना दहशतवादी हल्ल्याची माहिती देण्यात आली. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अशा कृत्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला भारतीय हवाई दलाने धडा शिकवला. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारताने एअर स्ट्राईक्स केले. यामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

गेले दोन आठवडे भारताने पाकिस्तानवर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले होते. याशिवाय सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द करण्यापासून पाकिस्तानी नागरिकांना देशातून बाहेर काढण्यापर्यंत विविध उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या. पण लष्करी कारवाई सुरु केली नव्हती. यामुळे पाकिस्तानही सतत भीतीच्या छायेखालीच होता. संयुक्त राष्ट्र समितीच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला सांगितले आहे की, भारताच्या या हल्ल्याला कोणत्याही प्रकारचे प्रत्युत्तर देऊ नका. अन्यथा मोठे युद्ध होईल.

अखेर मध्यरात्री दीडच्या सुमारास भारताने हवाई हल्ले करत कठोर कारवाईला सुरुवात केली. यापूर्वी भारताला प्रत्युत्तर देण्याच्या वल्गना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terrorist Attack) भारतातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून आहे. भारताने शेजारी देशासह सुरू असलेल्या या तणावादरम्यान बुधवारी मध्यरात्री (7 मे) पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनी ही कारवाई केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. ही तीच ठिकाणे आहेत जिथून भारतावर दहशतवादी हल्ले करण्याचे निर्देश दिले गेले होते. दरम्यान या हल्ल्यात काय काय नुकसान झालंय, याबाबत माहिती समजू शकलेली नाही. भारतीय सैन्य दलाकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ नुसार (Operation Sindoor) ही कारवाई करण्यात आली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान हादरलं
भारतीय सैन्य दलाच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान हादरलं आहे. भारताने मुजफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरमध्ये मोठा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. पाकिस्तानी माध्यमांच्या दाव्यानंतर काही वेळातच भारत सरकारनेही या हल्ल्याची अधिकृतपणे पुष्टी केली.

भारतीय सैन्य दलाकडून हवाई हल्ल्याआधी सोशल मीडियावरुन एक पोस्ट करण्यात आली होती. “प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः” आणि Ready to Strike, Trained to Win”, अशा आशयाची पोस्ट करण्यात आली होती. त्यानुसार काही वेळातच पहलगाम हल्ल्याचा हिशोब चुकता केला जाणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. सैन्य दलाने केलेल्या या कारवाईचं आता सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.

भ्याड हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा मृत्यू
दरम्यान पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर धर्म विचारुन गोळीबार केला होता. त्या भ्याड हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट होती. पाकड्यांना जशास तसं उत्तर द्यावं, अशी मागणी भारतीयांची होती. अखेर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानवर हवाई हल्ला करत शेजाऱ्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत.

भारतीय सैन्याचं पाकिस्तानला जशास तसं उत्तर

पाकिस्तानवर डिजीटल स्ट्राईक
दरम्यान भारताकडून पहलगााम हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील कलाकार आणि क्रीडापटूंच्या सोशल मीडिया खात्यांवर भारतात बंदी टाकण्यात आली. शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर या माजी पाकिस्तान क्रिकेटपटूंच्या यूट्युब चॅनेलवर भारतात बंदी टाकून त्यांची आर्थिक कोंडी करण्यात आली.

पाकिस्तानमधील मशीदीमधून घोषणा करण्यात येत आहे. नागरिकांनी घर सोडावं आणि सुरक्षित ठिकाणी जावं, अशी घोषणा पाकिस्तानमधील मशीदीमधून या एअर स्ट्राईकनंतर करण्यात येत आहे. भारताने केलेल्या या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण आहे. त्यामुळे मशि‍दींच्या माध्यमातून नागरिकांना आपलं राहतं घर सोडून सुरक्षित ठिकाणी जावं, असं आवाहन केलं जात आहे. पाकिस्तान सरकारकडून मशि‍दींच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत हा संदेश पोहचवला जात आहे. सरकारच्या या आवाहनानंतर नागरिक घरातून बाहेर पडत आहेत.

नक्की कोणत्या ठिकाणी एअर स्ट्राईक
भारतीय सैन्याकडून पाकव्याप्त काश्मीर तसेच बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबादमधील ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं आहे. याच ठिकाणांहून भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला गेला होता. भारताकडून करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. “भारत महिला आणि मुलांवर गोळीबार करत आहे. मशिदी उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत”, असं मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं. मात्र भारताकडून ही एअर स्ट्राईक फक्त दहशतवादांच्या तळांवर करण्यात आली आहे.

पाकिस्तानची टरकली
भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानची टरकली आहे. पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक माध्यमांनुसार, विमानतळावर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना तात्काळ विमानतळ रिकामं करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारताकडून करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तर काही विमानं वळवण्यात आली आहेत.

हेही वाचा   :    भाजपा मजबूत : पिंपरी चिंचवडमध्ये “कमळ”च फुलणार! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या एअरस्ट्राईकबद्दल विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की, ‘आम्ही त्याबद्दल ऐकले आहे. हे लज्जास्पद आहे. मला आशा आहे की हे लवकरच संपेल. दोन शक्तिशाली देशांना युद्धाच्या मार्गावर जाताना कोणीही पाहू शकत नाही. या दोन्ही देशांमधील इतिहास खूप जुना आहे आणि तणाव शिगेला पोहोचला आहे. पण या जगाला युद्धाची नव्हे तर शांतीची गरज आहे.’ मला वाटतं लोकांना थोड्याशा भूतकाळाच्या आधारे काहीतरी घडणार आहे हे माहित होतं, असंही ट्रम्प पुढे म्हणाले.

वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनानुसार, भारताच्या हवाई हल्ल्यानंतर लगेचच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकेच्या एनएसए आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांना फोन केला आणि त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. तर भारताच्या ऑपरेशन सिंदूरबद्दल अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला याबाबत माहिती आहे. सध्या आपण जास्त काही सांगण्याच्या स्थितीत नाही. सध्या आम्ही सध्याच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.

काय आहे ऑपरेशन सिंदूर? पाकिस्तानात घुसून दहशतवादी ठिकाणं उडवली
दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम भ्याड हल्ल्याची चीड भारतीयांच्या मनात गेली कित्येक दिवस घर करून होती. दोन आठवडे उलटून गेल्यानंतर कारवाई होत नसल्याने अस्वस्थता होती. पण केंद्र सरकार आणि सैन्य दल या भ्याड हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्याची जोरदार तयारी करत होतं. दहशवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता. भारताने या भ्याड हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल हे आधीच स्पष्ट केलं होतं. पण कधी आणि केव्हा हे मात्र निश्चित नव्हतं. अखेर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. या ऑपरेशन अंतर्गत एकूण ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला गेला. ही कारवाई योग्य रणनितीनुसार पार पडली. या हल्ल्यात एकही पाकिस्तानी सैन्य तळ नव्हतं, पण दहशतवादी ठिकाणांवर वेचून हल्ला केला आहे. भारताने दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. या प्रत्युत्तरातून भारताने स्पष्ट संदेश दिला की, दहशतवाद्यांना सोडणार नाहीत. भारत फक्त आता इशारा देत नाही तर कारवाई देखील करतो हा संदेश संपूर्ण जगाला गेला आहे.

‘मिशन सिंदूर’ नाव का?
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं होतं. महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या पतींना गोळ्या झाडल्या होत्या. त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव ‘मिशन सिंदूर’ ठेवलं गेलं. भारतीय सैन्य दलाने या मिशन अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना धडा शिकवला आहे. दहशतवाद्यांनी यापुढे कोणत्याही महिलेचं सिंदूर पुसण्याची हिंमत केली तर ते युद्धासारखं मानलं जाईल हा स्पष्ट संदेश या प्रत्युत्तरातून दिला आहे.

कायद्याच्या कक्षेत कारवाई
भारताने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कक्षेत कारवाई केली. या कारवाईचा कोणत्याही नागरी स्थानावर किंवा सामन्य नागरिकांवर परिणाम झाला नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्ट केलं की, ही कारवाई फक्त दहशतवादाविरुद्ध होती. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला नाही. पण पाकिस्तानमध्ये या हल्ल्यानंतर खळबळ उडाली आहे. अनेक दहशतवादी अड्डे रिकामी करण्यात आले आहेत. तसेच सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारताने २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राईक आणि २०१८ बालाकोट एअरस्ट्राईक केला होता. भारताने पाकिस्तानच्या भूमीवर केलेली ही तिसरी कारवाई आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button