राग अनावर झाल्याने त्याने मित्राचं गुप्तांग कापलं!
![Out of anger, he cut his friend's genitals!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/CRIME-compressed-1.jpg)
उत्तर प्रदेशातील बरेली येथील सिव्हिल लाईन्स परिसरातील हॉटेलमध्ये एका ३२ वर्षीय व्यक्तीने आपल्या ३० वर्षीय मित्राचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित दोघेही बरेली महानगरपालिकेत कंत्राटी कामगार आहेत. ही घटना शनिवारी घडली.
आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, “तो वर्षभरापूर्वी पीडित तरूणाच्या संपर्कात आला होता. काही महिन्यांपूर्वी, तो मला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला जिथे त्याने घाणेरडे कृत्य केले आणि आक्षेपार्ह स्थितीत माझा व्हिडीओ शूट केला. यानंतर त्याने मला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देखील दिली. तेव्हापासून त्याने माझ्याकडून अनेकदा पैसे देखील घेतले.”
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दोघे एका हॉटेलमध्ये भेटले, जेथे आरोपीने संबंधित तरूणाला त्याच्या मोबाइलवरून तो व्हिडीओ हटविण्यास सांगितले, परंतु त्याने ऐकले नाही आणि त्याने प्रथम आरोपीवर हल्ला केला. यानंतर प्रत्युत्तर म्हणून आरोपीने धारदार शस्त्राने त्याचे गुप्तांग कापले.
कोतवाली पोलीस स्टेशनचे एसएचओ हिमांशू निगम यांनी सांगितले की, “याप्रकरणी अद्याप कोणतीही लेखी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आहे. या घटनेचा तपास सुरू असून पुढील तपासासाठी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले जात आहेत. लवकरच संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवला जाईल.”
दरम्यान, बरेली जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. हरीश चंद्र यांनी सांगितले की, पीडित तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर आरोपीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.