ताज्या घडामोडीविदर्भ विभाग

निर्यात शुल्क हटवूनही कांदा भावात घसरण

कांदा निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क हटवल्यानंतरही अपेक्षित बाजारभावात वाढ

नांदेड : कांदा निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क हटवल्यानंतरही अपेक्षित बाजारभावात वाढ न झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये मंगळवारी (ता. १) कांद्याच्या भावात दोनशे ते तीन हजार ३०० रुपयांची घसरण झाली. यामुळे सरासरी बाजारभाव एक हजार २०० ते एक हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.

केंद्र सरकारने १ एप्रिलपासून कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटविल्याने शेतकरी आनंदात होते. मात्र, बाजारात उन्हाळ कांद्याची आवक झाल्यामुळे भाव कोसळले. विशेषतः मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात दाखल झाला.

त्यामुळे लासलगाव बाजार समितीत कांद्याचे भाव घसरले. १ एप्रिलपासून निर्यात शुल्क हटविल्यानंतर बाजारात सकारात्मक परिणाम दिसण्याची अपेक्षा होती. परंतु तसे काही झाले नाही. सरकारच्या वतीने योग्य पावले उचलली जात नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

हेही वाचा –  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतली मनोज जरांगेची भेट

पाच दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने मंगळवारी कांदा बाजारात विक्रीसाठी आणला. मात्र, लिलाव सुरू होताच भाव गडगडले. लासलगाव बाजार समितीत मंगळवारी सातशेहून अधिक वाहनांतून कांदा दाखल झाला. जास्तीत जास्त एक हजार ६०२ रुपये, किमान ५०० रुपये आणि सरासरी एक हजार ते एक हजार २०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्राने कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहनपर अनुदान दिले पाहिजे. जर सरकारने यावर उपाययोजना केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

निर्यात शुल्क हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतरही कांद्याचे भाव वाढले नाहीत. २३ मार्चला जो कांदा बाजारात एक हजार ५०० ते एक हजार ६०० भावाने विक्री होत होता, तो आता अकराशे ते बाराशेवर आला आहे. त्यामुळे ४०० रुपये प्रतिक्विंटल नुकसान झाले आहे. सरकारने आम्हाला एक हजार रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे.

-राजेंद्र क्षीरसागर, शेतकरी

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button