Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पाकव्याप्त कश्मीरमध्ये पाकिस्तानी सरकारची दडपशाही

शाहबाज शरीफच्या निर्णयाने संताप, आपल्याच लोकांना गोळ्या घालण्याचा आदेश

राष्ट्रीय : पाकव्याप्त कश्मीरमध्ये पाकिस्तानी सरकारची दडपशी सुरु असते आणि हे जगजाहीर आहे. या भागाला पाकिस्तानी सरकारने दहशतवाद्यांचे अड्डे बनवून ठेवले आहे, तसेच येथे राहणाऱ्या लोकांना कोणतीही सुविधा मिळत नाही. याच मुद्द्यावरुन पाक व्याप्त कश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांना सरकारविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने त्यांच्या मागण्यांवर विचार करण्याऐवजी गोळीबार केला आहे. नागरिकांवर होत असलेल्या गोळीबाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकव्याप्त कश्मीरमधील नागरिक त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे विनंती करत आहेत. हे लोक रस्त्यांवर उतरले आहेत. ते पाहून पाकिस्तानची सेना आणि सरकारने आपल्या लोकांवरच गोळ्या झाडायला सुरुवात केली आहे. सोमवारी या आंदोलनाला समोरे जाण्यासाठी पाकिस्तान सरकार योजना आखत होते. तीन हजाराहून अधिक सैनिक पाकव्याप्त कश्मिरमध्ये हजर झाले आहेत. तसेच रविवारी रात्रीपासूनच इंटरनेट बंद करण्यात आलं होतं, जेणेकरून जास्त लोक एकत्रित येऊ शकणार नाहीत. सरकारच्या या निर्णयाला देखील नागरिकांनी मोडीत काढले. अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना हाकलण्यासाठी पोलिसांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा  : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

विरोध करताच गोळ्या झाडल्या

पाकव्याप्त कश्मीरमध्ये उपस्थित असलेल्या संघटनेने एएसीने आपल्या ३८-सूत्री मागण्या मांडल्या आहेत. त्यांच्या मुख्य मागण्या पीओके विधानसभेतील १२ राखीव जागा रद्द करण्याचा समावेश आहे. या जागा पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या काश्मीरी शरणार्थींसाठी राखीव आहेत. स्थानिक लोकांचा युक्तिवाद आहे की, या जागा त्यांच्या प्रतिनिधित्वाला कमकुवत करतात आणि प्रादेशिक प्रशासनावर बाहेरील नियंत्रण वाढवतात. इतर प्रमुख मागण्या म्हणजे सबसिडी असलेले पीठ, मंगला डॅम जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित योग्य वीज दर आणि संघीय सरकारने वचन दिलेल्या प्रलंबित घटनात्मक सुधारणांचा तात्काळ अंमलबजावणी करणे यांचा समावेश आहे.

जेव्हा याच मागण्या घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले, तेव्हा तुम्ही पाहू शकता की त्यांना पोलिसांच्या क्रूरतेचा सामना करावा लागला. आता हे आंदोलन पाकिस्तानपुरता मर्यादित राहिलेले नाही. जगातील विविध देशांमध्ये राहणाऱ्या पीओके नागरिकांचानीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

शहबाज शरीफांची अपील

पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ एकीकडे नागरिकांवर गोळ्या झाडत आहेत, तर दुसरीकडे लंडनमध्ये बसून सरकारने आधीच ३८ पैकी ३६ मागण्या मान्य केल्या आहेत असे म्हणत आहे. तसेच पाकिस्तानात परतल्यानंतर तेथील नेत्यांशी भेट घेतील असेही म्हणत आहेत. माध्यमांशी बोलताना शहबाज शरीफ यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या भाऊ आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पूर्ण पाठिंबा आहे. शहबाज शरीफ यांनी दावा केला की आसिम मुनीर आणि ते मिळून निर्णय घेत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button