Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
आता एक लिटर पेट्रोलसाठी 272 रुपये मोजावे लागणार

डिझेल १७.२० रूपये, रॉकेल १२.९० रूपयांनी महागले
Petrol : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटींची पूर्तता करण्यासाठी पाकिस्तान सरकारने अचानक पेट्रोलचे भाव वाढवले आहेत. पाकिस्तानने एका रात्रीत पेट्रोलचा दर तब्बल 22.20 रुपयांनी वाढवला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आता एक लिटर पेट्रोलसाठी 272 रुपये मोजावे लागणार आहेत.
आयएमएफने कर्जाच्या फेररचना करून देण्यासाठी सरकारने जनतेकडून नवे कर तसेच इंधन दरवाढीतून अतिरिक्त १७० अब्ज रूपये गोळा करावेत, अशी अट नाणेनिधीने टाकली आहे.
शहाबाज शरीफ सरकारने संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लगेच ही मोठी दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानात डिझेल १७.२० रूपये, रॉकेल १२.९० रूपये, हलके डिझेल ९.६८ रूपयांनी महागले आहे.





