नोएल टाटा टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष, नोएल टाटा कोण आहेत?
![Noel Tata Who is the new Chairman of Tata Trust, Noel Tata?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Noel-Tata-1-780x470.jpg)
Noel Tata | दिवंगत उद्योजन रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला आहे. रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांच्या हाती टाटा समूहाची सूत्रे येणार आहेत. रतन टाटांच्या निधनानंतर मुंबईत टाटा समुहाची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सर्व वरिष्ठ अधिकारी व विश्वस्तांच्या सहमतीने रतन टाटांचे भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टचे नवे चेअरमन म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
टाटा समुहाच्या दोन सर्वात मोठ्या धर्मादाय संस्था सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांच्या प्रमुखपदी आता नोएल टाटांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोएल टाटा हे याआधी या दोन्ही संस्थांचे विश्वस्त म्हणून कार्यरत होते. आता ते या संस्थांचा कारभार पाहतील. आधी रतन टाटा हे काम पाहत होते. स्वतः रतन टाटा यांनी या संस्था उभारण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. टाटा समुहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टची मोठी भागिदारी आहे. टाटा ट्रस्टकडे टाटा सन्सची तब्बल ६६ टक्के भागिदारी आहे. टाटा समूह टाटा ट्रस्टद्वारे चालवला जातो. टाटा ट्रस्ट धर्मादाय उपक्रम आणि प्रशासनावर देखरेख ठेवण्याचं काम पाहते.
हेही वाचा – काँग्रेस-महाविकास आघाडीचे समर्थक ॲड. असीम सरोदे यांची ‘‘लाडकी बहीण’’ योजनेविरोधात न्यायालयात धाव!
रतन टाटांचे वडील नवल टाटा यांनी दोन लग्नं केली होती. नवल टाटांचं पहिलं लग्न सूनी कमिश्रिएट यांच्याशी झालं होतं. सूनी व नवल दाम्पत्याला दोन मुलं होती. रतन व जिमी अशी त्यांची नावं आहेत. या दोघांनी देखील लग्नं केली नाहीत. तर, नवल यांनी १९५५ मध्ये स्वित्झर्लंडमधील उद्योजिका सिमोन यांच्याशी दुसरं लग्न केलं. या जोडप्याने एका मुलाला जन्म दिला. तो मुलगा म्हणजे नोएल टाटा.
नोएल टाटा कोण आहेत?
नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष असतील. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. रतन टाटा यांच्या वडिलांचं नाव नवल टाटा तर आईचं नाव सोनी टाटा यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर नवल टाटा यांनी सिमोन यांच्याशी लग्न केलं. या दोघांच्या मुलांचं नाव नोएल टाटा आहे. नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहेत.