आंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

मुंबईवरील २६ /११ हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात आणले

राणावर मुंबईवर दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप

आंतरराष्ट्रीय : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर पाकिस्तानच्या कसाबसह दहा अतिरेक्यांनी दहशतवादी हल्ला करण्याच्या घटनेचा मास्टरमाईंड तहव्वुर राणा याला अमेरिकेतून प्रत्यार्पणाद्वारे भारतात आणले जात आहे. भारतीय एजन्सी त्याला स्पेशल विमानाने भारतात आणत आहेत. तहव्वुर राणा याला अमेरिकन लष्कराच्या स्पेशल विमानाने आणले जाणार आहे. उद्या सकाली दिल्लीत हे विमान लँड होणार आहे. भारतासाठीचा मोस्ट वॉण्टेड दहशदवादी तहव्वुर राणा याच्या पापांचा घडा भरल्याने उद्या सकाळी त्याला त्याने केलेल्या कर्माची सजा भोगण्यासाठी भारताच्या भूमीवर आणले जात आहे. तहव्वूर राणा याला आणणारे विमान दिल्लीच्या टेक्निकल एअरपोर्टवर लँड होऊ शकते. आता भारतात त्याच्या विरोधात काय काय होणार , पाहा …

वास्तविक, अमेरिकेकडून प्रत्यार्पणानंतर भारतात आणल्यानंतर तहव्वुर राणा याच्यावर खटला चालणार आहे. तहव्वुर राणा सरेंडर वॉरंटवर कारवाई झाली असून तपास यंत्रणा त्याला भारतात आणत आहे. भारताने अमेरिकेला तहव्वुर राणा याच्या सुरक्षेची हमी दिली आहे. या आधी अमेरिकन कोर्टात तहव्वुर राणा याने कोठडीतील त्रास आणि भारतातील कायदेशीर मदतीसंदर्भात चिंता व्यक्त केली होती. अमेरिकन अधिकाऱ्यांनी तिहार तुरुंगातील तहव्वुर राणा याच्या सुरक्षेच्या संदर्भात मागितली होती. त्यामुळे तहव्वुर राणा याला तिहार तुरुंगातच ठेवले जाईल असे म्हटले जात आहे.

कोण आहे तहव्वुर राणा?
तहव्वुर राणा मूळचा पाकिस्तानी आणि कॅनडाचा नागरिक आहे. तो पाकिस्तानातील लष्कर -ए-तैयबाचा सक्रीय सदस्य राहिलेला आहे.त्याने या हल्ल्याचा आणखी एक मास्टरमाईंड डेव्हीड कोलमन हेडली याला हल्ल्या संदर्भात महत्वाचे दस्तावेज पुरविण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. डेव्हीड कोलमन हेडली याने मुंबईतील महत्वाच्या स्थळांची रेकी केली होती. त्यानंतर तेथे हल्ले करण्यात आले होते. मुंबईतील २६ नोव्हेंबर २००८ च्या हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह १६४ जण ठार झाले होते.

हेही वाचा –  त्रिवेणीनगरमधील चौकांमध्ये दोन्ही बाजूंना ‘हाईट बॅरीगेट्स’

तहव्वुर राणाला भारतात आल्यावर काय होणार ?
तहव्वुर राणा याला भारतात आणल्यानंतर पटियाला हाऊस येथील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोर्टात हजर करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या वेळी कोर्टात एनआयए आरोपीची चौकशीसाठी कोठडी मागू शकते. त्यामुळे एनआयएचे मुख्यालय आणि तिहार तुरुंगातील सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे.

तहव्वुर राणावर काय आरोप आहेत ?
डिसेंबर २०११ रोजी एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात तहव्वुर राणा, डेविड कोलमन हेडली आणि सहा अन्य आरोपींवर भारतात अतिरेकी हल्ल्याची योजना तयार करणे आणि ती तडीस नेण्याचे आरोप ठेवण्यात आले होते. या आरोपपत्रात १३४ साक्षीदारांचे जबाब, २१० दस्तावेज आणि १०६ ईमेलचा समावेश होता. यात डेव्हीड कोलमन हेडली याच्या पत्नीचा ईमेल देखील होता.ज्यात तिने हेडलीला ग्रॅज्युएशनसाठी शुभेच्छा दिल्या होत्या आणि म्हटले होते की तिने अतिरेकी हल्ल्याचे प्रसारण पाहील्याचे लिहीले होते. एनआयएने शोधून काढलेल्या ईमेलमधून कळाले की २६/११ च्या हल्ल्याआधी डेव्हीड हेडली आणि तहव्वुर राणा कायम संपर्कात होते.

आरोपपत्रात काय – काय ?
आरोप पत्रात तहव्वुर राणा 2005 मध्ये लश्कर-ए-तैयबा आणि हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी या संघटनेचा एक ऑपरेटिव्ह म्हणून हल्ल्याच्या कटाचा एक भाग होता. तो पाकिस्तानातील कट रचणाऱ्यांच्या सोबत जोडलेला होता.तहव्वुर राणा याने डेव्हीड हेडलीला रसद आणि आर्थिक मदत पोहचवली होती. हेडलीला आधीच निश्चित केलेल्या लक्ष्यांची रेकी करणे आणि अन्य दुसऱ्या टार्गेटना शोधण्याचे काम सोपवले होते असे आरोपपत्रात म्हटले आहे.

NIA तहव्वुर राणाकडून काय उकलणार
NIA ला संशय आहे की तहव्वुर राणा याला मुंबईवर हल्ल्याची संपू्र्ण माहीती होती. तपास अधिकाऱ्यांच्या मते तहव्वुर राणा याने त्याची पत्नी समरज राणा अख्तर सोबत १३ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर, २००८ दरम्यान हापुड, दिल्ली, आगरा, कोच्ची, अहमदाबाद आणि मुंबईचा दौरा केला होता.NIA या दौऱ्यामागेचा हेतू जाणू इच्छित आहे. तहव्वुर राणा याला चौकशी दरम्यान, अतिरेक्यांचे ईमेल, कॉल रेकॉर्ड, आणि तपसा करताना मिळालेले अन्य तांत्रिक पुरावे देखील दाखवले जाऊ शकतात. तपासात हे उघडकीस आले आहे की डेव्हीड हेडलीने पोलिस यंत्रणेपासून लपण्यासाटी वेगवेगळे ईमेल पत्त्यांचा वापर केला होता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button