आंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

मुकेश अंबानी यांचा नवीन वर्षापूर्वी जिओ युजरला झटका

जिओने नुकताच अनलिमिटेड डेटा प्लॅन लॉन्च

राष्ट्रीय : रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी नवीन वर्षापूर्वी जिओ युजरला झकटा दिला आहे. जिओ व्हाऊचरच्या माध्यमातून रिचार्ज करण्यात येणाऱ्या दोन प्लॅनमध्ये बदल करण्यात आला आहे. कंपनीचे सर्वात स्वस्त असणाऱ्या दोन प्लॅनमध्ये बदल झाला आहे. 19 रुपये आणि 29 रुपये किंमत असलेल्या प्लॅनच्या व्हॅलिडिटीमध्ये बदल केला आहे. या प्लॅनच्या व्हॅलिडिटी पूर्वी एक्टीव्ह प्लॅनसोबत होती. आता कंपनीने व्हॅलिडीटी कमी करुन एक आणि दोन दिवसांची केली आहे.

कंपनीच्या निर्णयामुळे युजरला 19 रुपयांच्या व्हाऊचर प्लॅनवर फक्त एक दिवस व्हॅलिडीटी मिळणार आहे. तसेच 29 रुपये व्हाऊचरची व्हॅलिडीटी दोन दिवस मिळणार आहे. यापूर्वी या दोन प्लॅनची व्हॅलिडीटी एक्टीव्ह प्लॅनपर्यंत होती. म्हणजे जिओचा दोन महिन्यांचा प्लॅन युजरने घेतला असेल आणि त्याने व्हाउचर डेटा प्लॅन 19 किंवा 29 रुपये घेतला तर प्लॅन संपेपर्यंत म्हणजे दोन महिने त्याची व्हॅलिडीटी होती. परंतु आता एक आणि दोन दिवस ही व्हॅलिडीटी असणार आहे.

युजर असा करत होते वापर
जिओ युजर हा डेटा प्लॅनचा वापर त्यांचा रोज मिळणारा डेटा संपल्यावर करत होते. त्यानंतर आपल्या सुविधेनुसार त्या डेटाचा वापर करत होते. परंतु आता हा डेटा एक किंवा दोन दिवसांतच संपवावा लागणार आहे. कंपनीने यावर्षी 3 जुलै रोजी सर्व प्लॅन महाग केले होते. त्यात 15 रुपये असणारा डेटा व्हाउचर 19 रुपयांना करण्यात आले. तसेच 25 रुपये प्लॅन असणारा डेटा व्हाऊचर 29 रुपये केला.

नवीन अनलिमिटेड डेटा प्लॅन
जिओने नुकताच अनलिमिटेड डेटा प्लॅन लॉन्च केला आहे. त्यामध्ये युजर्सला 601 रुपयांसोबत वर्षभर 5जी नेटवर्कची अनलिमिटेड डेटा सुविधा मिळणार आहे. या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी युजरला 1.5 जीबी डेटा प्रतिदिवसाचा प्लॅन घ्यावा लागणार आहे. 601 रुपयांमध्ये 12 अपग्रेड व्हाऊचर मिळणार आहे. ते दर महिन्याला एक, एक रिडीम करु शकतात. त्यानंतर अनलिमिटेड 5G ची सुविधा मिळू शकते. यामधील प्रत्येक व्हाउचरची मर्यादा 30 दिवसांची आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button