Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तक
माटे शाळेचा विद्यार्थी प्रेम खरबड शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम
शिक्षण विश्व : एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत यश

पिंपरी-चिंचवड : एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत चिंचवडगाव येथील व्ही. के. माटे हायस्कूल मधील प्रेम प्रमोद खरबड हा विद्यार्थी गुणवत्ता यादीत 112 गुण मिळवून पुणे जिल्ह्यात प्रथम आला आहे.
राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षाकरिता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वरील परीक्षा घेण्यात आली. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका इंद्रायणी माटे पिसोळकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मोरया शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी उपमुख्याध्यापक दिलीप कुमावत, पर्यवेक्षिका मैत्रेयी राजे आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.