ताज्या घडामोडी

तुम्हाला Maruti Ertiga खरेदी करायची असल्यास ही बातमी नक्की वाचा

विशेष म्हणजे तुमची यात 1.04 लाख रुपयांची बचत होऊ शकते.

पुणे : तुम्हाला कार घ्यायची आहे का? कार घ्यायची आहे पण ती स्वस्तात हवी आहे का? त्यातही तुम्हाला 7 सीटर घ्यायची आहे का? या तिन्ही प्रश्नाची एकच खास ऑफर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विशेष म्हणजे ही ऑफर तुम्हाला परवडणारी आहे. हो. आम्ही सत्य बोलत असून तुम्हाला या किफायतशीर ऑफरविषयी सांगणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला Maruti Ertiga 7 सीटर अगदी स्वस्तात खरेदी करण्याचा एक चांगला मार्ग सांगणार आहोत. विशेष म्हणजे तुमची यात 1.04 लाख रुपयांची बचत होऊ शकते. कॅन्टीन स्टोअर डिपार्टमेंटच्या (सीएसडी) कर्मचाऱ्यांना करात मोठी सूट मिळते. याविषयी पुढे जाणून घेऊया.

भारतातील नंबर 1 बेस्टसेलर 7 एमपीव्ही Maruti Ertiga 7 सीटर ही कंपनी बऱ्याच काळापासून आपल्या सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. जर तुम्हीही या एमपीव्हीचे चाहते असाल आणि ते घरी आणू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला Maruti Ertiga 7 सीटर अगदी स्वस्तात खरेदी करण्याचा एक चांगला मार्ग सांगणार आहोत. त्यामुळे या कारवर तुम्हाला 28 टक्क्यांऐवजी फक्त 14 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही पद्धत.

हेही वाचा –  विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय !

Maruti Ertiga सीएसडी प्राइस कॅन्टीन स्टोअर डिपार्टमेंटच्या (सीएसडी) कर्मचाऱ्यांना करात मोठी सूट मिळते. कार24 नुसार, सध्या Maruti Ertiga साठी कॅन्टीनची किंमत 7.89 लाख रुपये आहे. सिव्हिल मॉडेलची किंमत 8.84 लाख रुपये आहे. म्हणजेच सीएसडी दरानुसार तुम्ही प्रत्येक व्हेरियंटवर 95,000 रुपयांपर्यंत टॅक्स वाचवू शकता. जर तुम्ही सीएसडी दरानुसार ही कार खरेदी करण्यास पात्र असाल तर तुम्ही प्रत्येक व्हेरियंटवर 1.04 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता.

भारतात अहमदाबाद, कोलकाता, मुंबई, दिल्ली अशा शहरांसह देशभरात एकूण 34 सीएसडी कॅन्टीन डेपो आहेत. ही सीएसडी कॅन्टीन भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येतात. या कॅन्टीनमध्ये सरकार सैनिकांना वैद्यकीय, रेशनसह इतर अनेक वस्तूंवर मोठी करसवलत देते. जेणेकरून या वस्तू स्वस्तात खरेदी करता येतील.

तुम्हाला Maruti Ertiga 7 सीटर अगदी स्वस्तात खरेदी करण्याचा एक चांगला मार्ग वर सांगितला आहे. त्यामुळे या कारवर तुम्हाला 28 टक्क्यांऐवजी फक्त 14 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. कार घ्यायची असेल तर त्यापूर्वी त्या वाहनाची संपूर्ण माहिती असणे देखील गरजेचे आहे. ही माहिती तुमच्या उपयोगात येऊ शकेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button