Pahalgam Terrrorist Attack | पहलगाम हल्ल्यानंतर मोठी कारवाई, संशयित दहशतवादी आसिफ-आदिलचे घर उद्ध्वस्त

Pahalgam Terrrorist Attack | पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल ठोकर या दोघांचे घर उद्ध्वस्त करण्यात आले आहे. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहेत. सुरक्षा दलांना आदिलच्या घरात एक संशयास्पद पेटी सापडली होती.
२२ एप्रिल रोजी बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित व्हिडिओमध्ये आसिफ आणि आदिल हे दोघेही दिसत होते. या भ्याड हल्ल्यानंतर दोघेही फरार आहेत. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग आणि पुलवामामध्ये सुरक्षा दलांनी ही कारवाई केली आहे. त्राल परिसरातील लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचे घर उडवून देण्यात आले आहे. अनंतनाग पोलिसांनी गुरुवारी आदिलचे रेखाचित्र औपचारिकपणे जारी केले होते. आदिल २०१८ मध्ये पाकिस्तानला गेल्याचे सांगितले जात आहे. त्याने पाकिस्तानमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले आणि नंतर काश्मीरला परतला.
हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन
आसिफ शेख हा दक्षिण काश्मीरचा रहिवासी आहे. त्याचे घरही उडवून देण्यात आले आहे. आसिफ शेखच्या घराची झडती घेत असताना सुरक्षा दलांना एक संशयास्पद बॉक्स सापडला. पण या कारवाईचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये दोन्ही दहशतवाद्यांच्या घरांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. फरार दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दल सतत मोहीम राबवत आहेत. लोकांना ताब्यात घेऊन चौकशीही केली जात आहे. बैसरण व्हॅली आणि पहलगाम व्यतिरिक्त खोऱ्यातील इतर भागातही दहशतवादविरोधी कारवाया केल्या जात आहेत.