हुरा रे हुरा… आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे…. होरयो… कोकणात उद्यापासून शिमगोत्सवाला सुरुवात
ग्रामदेवतेच्या 1 हजार 520 पालख्या वाजतगाजत भक्तांच्या भेटीला येणार
हुरा रे हुरा… आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे…. होरयो… रत्नागिरी जिल्ह्यात उद्या शिमगा साजरा होणार आहे. शिमगा हा कोकणातील प्रमुख सण आहे. गावकरी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने शिमगा साजरा करतात. गावच्च्या एकजुटीचे दर्शन घडवणारा हा शिमगा उत्सव कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात 1 हजार 312 ठिकाणी सार्वजनिक शिमगोत्सव आणि 2 हजार 840 ठिकाणी खासगी शिमगोत्सव साजरा होणार आहे. ग्रामदेवतेच्या 1 हजार 520 पालख्या वाजतगाजत भक्तांच्या भेटीला येणार आहेत.
कोकणात शिमगोत्सवाची धूम सुरु आहे. शिमगोत्सवाची ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपली गेली आहे. गावागावात होळी उभारून गावकरी एकत्र येत जोरदार फाका देतात. हुरा रे हुरा… आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे…. होरयो… आखाडी रे आखाडी… आमच्या भगवती मातेची सोन्याची पाखाडी… अशा फाका देत शिमगोत्सव साजरा केला जातो. गावागावात ग्रामदेवतेच्या पालख्याही सजल्या आहेत. ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्साहात आणि वाजतगाजत साजरा केला जातो. ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी आणि हातभेटीचा नारळ देण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावी आले आहेत. चाकरमान्यांनी आता गावची घरे भरुन गेली आहेत. फाकपंचमीला गावागावात होळ्या उभ्या करून शिमगोत्सवाची सुरुवात झाली. उद्या रात्री होम पेटवून शिमगा साजरा केला जाणार आहे. रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीबुवांचा शिमगोत्सवही धुमधडाक्यात साजरा होणार आहे.
एसटीच्या तब्बल 300 गाड्या
गावच्या शिमग्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने रत्नागिरी जिल्ह्यात येतात. चाकरमान्यांसाठी एसटीने शिमगोत्सवाकरीता यंदा 300 जादा गाड्या सोडल्या आहेत. कोकण रेल्वेनेही होळी स्पेशल जादा गाड्या सोडल्या असून सर्व गाड्या फुल आहेत. अनेक चाकरमानी वेटींगवर प्रवास करत आहेत.
तिखटा सण बुधवारी
शिमगोत्सवात गोडा सण आणि तिखटा सण साजरा केला जातो. उद्या रविवार असला तरी उद्या होळी असल्याने गोडा सण साजरा होणार आहे. उद्या पुरणपोळी आणि गोडधोड पंचपक्वान्नाचा बेत आखला जाणार आहे. धुलीवंदनाच्या दिवशी तिखटे सण साजरे केले जातात. यंदा मात्र सोमवार आल्यामुळे तिखटे सण बुधवारी साजरे होणार आहेत.
हुरा रे हुरा… आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे…. होरयो… रत्नागिरी जिल्ह्यात उद्या शिमगा साजरा होणार आहे. शिमगा हा कोकणातील प्रमुख सण आहे. गावकरी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने शिमगा साजरा करतात. गावच्च्या एकजुटीचे दर्शन घडवणारा हा शिमगा उत्सव कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात 1 हजार 312 ठिकाणी सार्वजनिक शिमगोत्सव आणि 2 हजार 840