Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

Pimpri-Chinchwad : चिखलीमधील दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील चिखली भागात एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन लहानग्यांचा समावेश आहे. पहाटे गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाला स्वत:चा जीव वाचवण्यासही अवधी मिळाला नाही. दरम्यान, आग नियंत्रणात आली असून कुलिंगचं काम सुरू आहे.

बुधवारी पहाटेच्या सुमारास चिखलीमधील सचिन हार्डवेअरला ही आग लागली होती. याच हार्डवेअरमध्ये कुटुंब वास्तव्यास होतं. ही आग इतकी भीषण होती की, आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चिमणाराम चौधरी, ज्ञानुदेवी चौधरी, सचिन चौधरी (वय-१०), भावेश चौधरी (वय-१५) असं मृत पावलेल्यांची नावं आहेत.

हेही वाचा – राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात स्वबळावरच लढणार – महादेव जानकर यांची घोषणा

दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळं ही भीषण आग लागली असल्याचा अग्निशामक दलाचा प्राथमिक अंदाज आहे. पिंपरी चिंचवड अग्निशामक दलानं ही आग नियंत्रणात आणली असून, कुलिंगचे काम सुरु आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button