प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची नेमकी खासियत काय? त्या मूर्तीचे वैशिष्ट्ये नक्की जाणून घ्या..
![Know what is the special feature of the idol of Lord Shriram..](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Ayodhya-Ram-Mandir-1-1-780x470.jpg)
Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांच्या ५०० वर्षांचा वनवास आज संपला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी १२.२९ मिनिटांनी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर गर्भगृहातील रामललाची पहिली छायाचित्रे समोर आली आहेत. रामललाला सोन्याच्या दागिन्यांनी मढवण्यात आलं आहे. तसेच, त्याच्या हातात सोन्याचा धनुष्यबाण आहे. प्रभू रामचंद्राचं तेजस्वी रुप पाहून डोळ्यांचं पारण फिटतंय.
रामललाच्या मूर्तीमध्ये काय खास आहे आणि मूर्तीची सर्व वैशिष्ट्ये काय आहे हे माहिती नाही. चला तर मग आपण ते जाणून घेऊयात..
Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील मंदिरातल्या प्रभू श्रीराम मूर्तीचं पहिलं दर्शन! #RamMandirPranPrathistha #RamMandirAyodhya pic.twitter.com/ZCQgh77Z12
— Mahaenews (@mahae_news) January 22, 2024
हेही वाचा – Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील मंदिरातल्या प्रभू श्रीराम मूर्तीचं पहिलं दर्शन! पाहा व्हिडीओ..
मूर्तीवर भगवान विष्णूचे दहा अवतार
रामललाच्या या मूर्तीसोबत दगडापासून आकाराची चौकट तयार करण्यात आली आहे. त्यावर भगवान विष्णूचे दहा अवतार कोरण्यात आले आहेत. ज्यामध्ये मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की यांचे अवतार आहेत. यासोबतच मूर्तीच्या एका बाजूला गरूड तर दुसऱ्या बाजूला हनुमान दिसत आहेत.
एकाच दगडात कोरली मूर्ती
यासोबतच ही मूर्ती एकाच दगडापासून कोरण्यात आली आहे. ही मूर्ती तयार करताना दुसरा दगड जोडलेला नाही.
रामललाच्या या मूर्तीमध्ये मुकुटाच्या बाजूला सूर्यदेव, शंख, स्वस्तिक, चक्र आणि गदा दिसेल. मूर्तीमध्ये रामललाचा डावा हात धनुष्यबाण धरण्याच्या मुद्रेत दाखवला आहे. मूर्तीचे वजन सुमारे २०० किलो आहे. मूर्तीची उंची ४.२४ फूट आणि रुंदी तीन फूट आहे.