breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील मंदिरातल्या प्रभू श्रीराम मूर्तीचं पहिलं दर्शन! पाहा व्हिडीओ..

Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांच्या ५०० वर्षांचा वनवास आज संपला. आज दुपारी १२.२९ मिनिटांनी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यावेळी गर्भगृहात सरसंघचालक मोहन भागवत, उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदी बेन पटेल, राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते.

प्राणप्रतिष्ठेनंतर गर्भगृहातील रामललाची पहिली छायाचित्रे समोर आली आहेत. रामललाला सोन्याच्या दागिन्यांनी मढवण्यात आलं आहे. तसेच, त्याच्या हातात सोन्याचा धनुष्यबाण आहे. प्रभू रामचंद्राचं तेजस्वी रुप पाहून डोळ्यांचं पारण फिटतंय.

हेही वाचा   –   मंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा हे ही मोदी ठरवणार का? राहुल गांधींचा संतप्त सवाल 

अरुण योगीराज यांनी शाळीग्राम दगडापासून घडवलेल्या प्रभू श्रीरामाच्या प्रसन्न मूर्तीची पहिली झलक यापूर्वी १८ जानेवारी रोजी समोर आली होती, तर आज आभूषणांनी, फुलांनी व तुळशीच्या पानांनी सजवलेली, पिवळी वस्त्रे धारण केलेली श्रीरामांची पहिली झलक पाहायला मिळत आहे.

अयोध्येत राम मंदिराच्या पूजेच्या अगोदर नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक खास पोस्ट करण्यात आली होती. अयोध्या धाममध्ये श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण प्रत्येकालाच भावनिक करणारा आहे. या दिव्य कार्यक्रमाचा भाग होणं माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. जय सियाराम, अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button