ताज्या घडामोडी

खोक्या भोसले याच्या वकिलांनी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडे तक्रार दाखल

तूच हा गुन्हा केला असल्याचं कबूल कर, अन्यथा तुझ्या घराजवळ...

बीड : आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याला वन विभागाच्या कोठडीत असताना मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप खोक्या भोसले तसंच त्याच्या वकिलांनी केला आहे. यासंदर्भात आज खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या वकिलांनी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडे तक्रार देखील दाखल केलेली आहे.

हेही वाचा  :    विराट कोहलीने रचला इतिहास: टी-२० क्रिकेटमध्ये १३ हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज

यावेळी बोलताना सतीश भोसले याचे वकील अंकुश कांबळे यांनी सांगितलं की, सतीश भोसले याला वन विभागाने हरणाची शिकार आणि तस्करी करण्याच्या आरोपाखाली चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. यावेळी चौकशीदरम्यान सीसीटीव्ही बंद करून सतीश याला मारहाण करण्यात आली आहे. तसंच तूच हा गुन्हा केला असल्याचं कबूल कर, अन्यथा तुझ्या घराजवळ रायफल बॉम्ब ठेऊन तुला नक्षलवादी घोषित करू, अशा धमक्या दिल्या आहेत. याबद्दल आज आम्ही पोलीस अधीक्षकांना तक्रार देखील दिलेली आहे. तसंच सतीश भोसले याच्या संपूर्ण कुटुंबाला वन विभागाकडून धोका आहे, माझ्या जीवाला धोका आहे त्यामुळे आम्हाला पोलीससंरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली असल्याचं यावेळी बोलताना वकिलांनी सांगितलं

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button