ताज्या घडामोडीपुणे

पोटात खरोखर झाड उगवतं का?

बी चे छोटे तुकडे पोटात गेल्या तरी, शरीराच्या पचनतंत्रामुळे ...

पुणे : लहानपणी आपल्याला घरच्यांकडून अनेक अशा गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील, ज्यावर मोठं होऊन आपल्याला लक्षात येतं की त्या सर्व गोष्टी खोट्या होत्या. यामध्ये एक लोकप्रिय समज म्हणजे “जर एखाद्या फळाची बी चुकून पोटात गेली, तर पोटात झाड उगवते.” तुम्ही देखील हे ऐकले असावे, पण आता आपल्याला माहीत आहे की असं काही होत नाही. परंतु, असे का होत नाही? चला, आज या मिथकावर प्रकाश टाकूया.

पोटात खरोखर झाड उगवतं का?
खरंतर, हे पूर्णपणे खोटं आहे की, जर आपण एखादी बी खाल्ली तर आपल्या पोटात झाड उगवेल. घरच्यांनी मुलांना बी गिळण्यापासून रोखण्यासाठी हे सांगितले असावे. यामागे त्यांचा उद्देश मुलांना फळं चांगल्या प्रकारे चघळून खाण्याची सवय लागवणे आणि बी गिळू न देणे होता. परंतु, असं काही घडत नाही. बीचे छोटे तुकडे पोटात गेल्या तरी, शरीराच्या पचनतंत्रामुळे त्याचा काहीही परिणाम होत नाही.

हेही वाचा  :    विराट कोहलीने रचला इतिहास: टी-२० क्रिकेटमध्ये १३ हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज

पोटात झाड का उगवत नाही?
पोटात झाड उगवणं शक्य नाही, याचे कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे. बीला अंकुरित होण्यासाठी आवश्यक असलेल्या परिस्थिती जसं की प्रकाश, ऑक्सिजन आणि पोषक तत्वे, ती सर्व पोटात उपलब्ध नाहीत. पोटातील आम्ल (एसिड) बीजांच्या अंकुरण प्रक्रियेला थांबवते. मानवाच्या शरीरात असलेली पचनप्रणाली अन्न तोडून त्याचा शोषण करते, आणि यामुळे बी तुटून जाते. त्यामुळे, पोटात बी जरी गेली तरी, त्यापासून झाड उगवू शकत नाही.

तरीही, एक दुर्लभ आणि आश्चर्यकारक घटना वैद्यकीय इतिहासात घडली आहे. मॅसाचुसेट्स, युनायटेड स्टेट्समधील एका निवृत्त शिक्षकाच्या बाबतीत अशी एक घटना घडली. त्या शिक्षकांनी एका वेळेस बी गिळली आणि त्यांना श्वास घेतताना त्रास होऊ लागला. डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसांचे स्कॅन करण्यात आले, तेव्हा डॉक्टर आश्चर्यचकित झाले, कारण त्याच्या फुफ्फुसांमध्ये एक मटराचे झाड उगवत होतं! डॉक्टरांनी त्वरित ऑपरेशन करून ते झाड काढून टाकलं.

आपल्या शरीरात झाड उगवणं शक्य नाही, कारण पचनतंत्र आणि आम्ल यांच्या प्रभावामुळे बीचे अंकुरण होऊ शकत नाही. परंतु, काही अपवादात्मक घटनांमध्ये, ज्या वेळी अंकुर फुफ्फुसांमध्ये उगवतो, ते खूपच दुर्लभ आणि आश्चर्यकारक ठरू शकते. लाखांमधून एका केस मध्ये असे होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button