कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी ‘इतके’ वर्ष लागणार- बिल गेट्स
![It will take 'so many' years for the situation created by the corona to return to normal - Bill Gates](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/bill-gates.jpg)
वॉशिंग्टन – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. गेल्या सव्वा वर्षात कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागलं आहे. तसेच गेल्या सव्वा वर्षाच्या काळात कोरोनामुळे जवळपास 27 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
अनेक देशांनी कोरोनावर लस निर्माण केली आहे. पण तरीही कोरोनाचं प्रमाण कमी न होता, काही ठिकाणी वाढताना दिसतंय. मात्र आता ही महामारी कधीपर्यंत संपेल हे कोणीही सांगू शकलेलं नाही. अशातच पोलंडमधील एका प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये कोरोनाची ही महामारी कधीपर्यंत संपेल याबद्दल बोलताना मायक्रसॉफ्टचे संस्थापक ‘बिल गेट्स’ यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे.
कोरोनाची लस तयार झाली आहे. कोरोनाची साथ ही एक अविश्वसनीय आपत्ती आहे. त्यामुळे 2022 च्या अखेरीस जगातील परिस्थिती पूर्वीप्रमाणे यायला पाहिजे, असं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे.दरम्यान, जगभरात सध्या 12 कोटी 55 लाख 89 हजार 464 एवढी कोरोना रुग्णांची संख्या आहे. त्यापैकी 27 लाख 59 हजार 246 लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तर अमेरिकेमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप झाला असून एकून 3 कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला.