breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेश

Israel-Hamas : गाझातील रूग्णालयात भीषण स्फोट, ५०० जणांचा मृत्यू

Israel-Hamas : गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात घमासान युद्ध सुरू आहे. इस्रायल लष्कराने आता जमिनीवरील लढाई सुरू केली आहे. या दरम्यान, गाझातील अल-अहली या सिटी रुग्णालयात भीषण मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात तब्बल ५०० जणांचा मृत्यू झालाय, हमास संघटित आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

गाझातील अल अहली रुग्णालयात भीषण स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात जवळपास ५०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटामुळे रुग्णालय इमातीला भीषण आग लागली. या आगीत होरपळून अनेकांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णालय परिसरातील मैदानात मृतांचा खच पडला असून इमारतीच्या खिडक्या-दारेही तुटली आहेत. या मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे.

हेही वाचा – नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नवदुर्गा पैकी कुष्मांडा देवीची पूजा का केली जाते?

हा हल्ला कोणी केला हे अद्याप अस्पष्ट आहे. कारण, हसामने इस्रायलवर दावा केला आहे. इस्रायलने रुग्णालयावर हवाई हल्ला केल्याचं हमासकडून सांगण्यात येतंय. तर, इस्रायली लष्कराने हमासला या हल्ल्यामागे जबाबदार धरले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button