breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नवदुर्गा पैकी कुष्मांडा देवीची पूजा का केली जाते?

Navratri 2023 : दुर्गा देवीचे चौथे स्वरुप कुष्मांडा आहे. नवरात्राची चौथी माळ गुरुवार, १८ ऑक्टोबर रोजी आहे. ब्रह्मांडाची निर्मिती केल्यामुळे या रुपाला कुष्मांडा असे संबोधले जाते. कुष्मांडा आपल्या भक्तांची सर्व संकटे, रोग, शोक दूर करून यश, बुद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान करते. या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर झालेले असते.

या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कुष्मांडा देवीची पूजा, उपासना करावी, असे सांगितले जाते. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते.

हेही वाचा – आमदार अपात्रता प्रकरणावरून पृथ्वीराज चव्हाणांचा नार्वेकरांना सवाल; म्हणाले..

मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला, तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button