इराणचा पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला; दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकणार?
![Iran's Missile Attack on Pakistan; Will war break out between the two countries?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Iran-Pakistan-780x470.jpg)
Iran Missile Attack on Pakistan | हमास-इस्रायल युद्धानंतर आता पाकिस्तान-इराण यांच्यात युद्ध पेटण्याची शक्यता आहे. इराणने पाकिस्तान आणि इराकवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. यानंतर पाकिस्तानने इराणवर प्रतिहल्लाकेला आहे. तसेच पाकिस्तानने इराणला युद्धाचा इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणने मंगळवारी पाकिस्तानातील जैश एल अदिल या बलुस्थान प्रांतातील दहशतवादी गटाच्या दोन तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. त्यात दोन मुलांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. त्यानंतर पाकिस्तानने इराणला गंभीर परिणामांचा इशारा दिला आणि इराणमधील आपल्या राजदूतांना त्वरित माघारी बोलावले. इतकेच नव्हे तर दोन्ही देशांतील नियोजित द्विपक्षीय कार्यक्रम रद्द केले आहेत.
हेही वाचा – ठाकरे गटाचे नेते राजन साळवींच्या घरावर एसीबीची छापेमारी
BLA, BLF targetted by Pakistan in Iran. More details to follow. pic.twitter.com/ILLhdgQssW
— The Pakistan Daily (@ThePakDaily) January 18, 2024
दरम्यान, पाकिस्ताननेही आता इराणवर हल्ला केला असून इराणच्या बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीवर लक्ष्य केलं आहे. पाकिस्तानने इराणवर २० क्षेपणास्रे डागली असल्याचं वृत्त आहे.