breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ठाकरे गटाचे नेते राजन साळवींच्या घरावर एसीबीची छापेमारी

मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार राजन साळवी यांच्या घरावर एसीबीची छापेमारी सुरू आहे. राजन साळवींच्या रत्नागिरीतल्या घरी एसीबीकडून ही कारवाई सुरू आहे. गेल्या दीड वर्षांपासून राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची याप्रकरणी चौकशी सुरू आहे. परंतु, आता यापुढे एसीबीला सहकार्य करणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

राजन साळवी म्हणाले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पावलं कुठे पडतात हे मला समजतं. त्यामुळे ते माझ्याकडे येणार आहेत, हे मला माहित होतं. ते रत्नागिरीतील अल्पायशी हॉटेलमध्ये उतरले होते. तिथून ते माझ्याकडे येणार असल्याचं मला माझ्या विश्वासूंनी सांगितलं होतं. ज्या दिवशी मी शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाबरोबर राहिलो त्या दिवसापासून मी माझी मानसिकता केली होती की मला भविष्यात त्रास होणार. तो त्रास त्यांनी द्यायला सुरुवात केली. त्यांच्याकडे अटक वॉरंट असून त्यांनी कोणत्याही कागदपत्रांची मागणी केली नाही. आतापर्यंत माझ्या भावाची, त्याच्या पत्नीची, त्याची मुलं, माझी पत्नी, माझी दोन मुलं आणि व्यवसायासंबंधात चौकशी केली. आतापर्यंत मी एसीबी कार्यालयात सहा वेळा जाऊन सहकार्य केलं. मला माहित होतं ही मंडळी माझ्या घरापर्यंत येणार आहेत.

हेही वाचा   –   रामलल्लाच्या मूर्तीचा आज मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश! जलाधिवास-गंगाधीवास देखील होणार

माझे वरिष्ठ मला संपर्क साधतील. कार्यकर्ते, मतदार संपर्क साधतील. उद्धव ठाकरे आणि शिवसेना माझ्या पाठीशी आहे. पक्षावर माझा संपूर्ण विश्वास आहे. शिवसेना पक्ष म्हणून आम्ही ठाकरेंबरोबर राहिल्याने आम्हाला त्रास दिला जात आहे. राजन साळवी ही व्यक्ती काय आहे, कशी आहे, हे माझ्या कुटुंबाला, जनतेला आणि पक्षाला माहिती आहे. माझे मतदार माझ्या पाठिशी आहेत, असं राजन साळवी म्हणाले.

राजन साळवी यांच्या एकूण चार मालमत्तांवर एसीबीचे एकाचवेळी छापे पडले आहेत. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, माझ्या घरी, माझ्या लहान भावाच्या घरी, माझ्या जुन्या घरी आणि माझं लहान हॉटेल आहे, तिथेही छापे पडले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button