Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी
‘आय निलेश लंके, टेक ओथ…’; सुजय विखेंचं आव्हान स्वीकारलं अन् इंग्रजीमधून संसदेत घेतली शपथ

नवी दिल्ली : नगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आज संसदेमध्ये शपथ घेतली. यावेळी त्यांनी इंग्रजीमध्ये संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार सुजय विखे यांचे आव्हान स्वीकारून लंके यांनी इंग्रजीमधून शपथ घेतली असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा – शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
निलेश लंके यांच्या शिक्षकांवरून त्यांना अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजप नेते सुजय विखे यांनी देखील यावरून त्यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली होती. याच पार्श्वभूमीवर निलेश लंके यांनी संसदेमध्ये इंग्रजीमधून शपथ घेतली. यावेळी संसदेतील उपस्थित खासदार त्यांच्याकडे आश्चर्याने पाहात होते. काहींनी त्यांचे कौतुक केल्याचं देखील समजतं.





