“एकनाथ खडसें नंतर आता रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये आणणार”; रक्षा खडसेंचे मोठे विधान
जळगाव : एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत रक्षा खडसे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांना विश्वासात घेऊन एकनाथ खडसे यांचा भाजपात प्रवेश होणार आहे. राज्यातील नेत्यांची चर्चा करूनच एकनाथ खडसे भाजपा प्रवेश करणार आहेत.एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आली असून याचे भाजपशी कुठल्याही प्रकारचा राजकीय कनेक्शन नाही, निवडणुकीच्या काळात असे फेक कॉल हे येत असतात असे रक्षा खडसे म्हणाल्या.
एकनाथ खडसे तर आता भाजपमध्ये येत आहेतच, त्यानंतर रोहिणी खडसे भाजपमध्ये येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे विधान भाजपच्या रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी केले. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना भाजपमध्ये घेतले जाईल, असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा – भगवा ध्वज नाचवत खासदार बारणे यांचा श्रीराम नवमी शोभायात्रांमध्ये सहभाग
रोहिणी खडसे यांच्या राष्ट्रवादीत राहण्याच्या भूमिकेबाबत रक्षा खडसे म्हणाल्या की, रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीत राहण्याचा निर्णय घेतला, तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. त्या महिला प्रदेशाध्यक्षा असून त्यांना शरद पवारांसोबत काम करण्याची इच्छा आहे.असे असले तरी त्यांनी भाजपसोबत येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जास्तीत जास्त लोक भाजपकडे कसे वळविता येथील याच्यासाठी आमचा प्रयत्न सातत्याने असणार आहे.
निवडणुकीच्या काळात तणाव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे फेक कॉल लोक करत असतात, या फेक कॉलची चौकशी झाली पाहिजे असंही त्या म्हणाल्या.मी निवडून येणार आहे अशी मला अपेक्षा आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जास्तीत जास्त मताधिक्य कसे देता येईल याकडे माझा कल असणार आहे, असेही रक्षा खडसे म्हणाल्या.