‘जनता सगळं जाणते, ती मुर्ख नाही’; अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे ट्वीट चर्चेत

Tejaswini Pandit | मराठी अभिनेत्री तेसस्विनी पंडित ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती अभिनयासोबतच सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपलं मत स्पष्टपणे मांडत असते. अनेक महत्वाच्या मुद्द्यावर ती भाष्य करते. आता तिने एक्सवर केलेल्या एक पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने ‘जनता मुर्ख नाही. सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे!’ असं ट्वीट केलं आहे. तेजस्विनीने पोस्टमध्ये कुणाचंही नाव घेतलेलं नाही. तिच्या या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा – पक्षांतर करणाऱ्या आणि संधीसाधू नेत्यांबद्दल मंत्री नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
जनता मूर्ख नाही.
सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे !— TEJASWWINI (@tejaswwini) February 7, 2024
दरम्यान, तेजस्विनी पंडितने या पोस्टमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही. पण कमेंट्स पाहता ही पोस्ट सध्याच्या राजकीय परिस्थितीवर असल्याचं दिसतंय. निवडणूक आयोगाने अजित पवार गटच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय दिला आहे, त्या पार्श्वभूमीवर तेजस्विनीने ही पोस्ट केल्याचं दिसतंय.





