तुम्ही कधी ५व्या मजल्यावर बांधलेला पेट्रोल पंप पाहिला आहे का? व्हिडिओ नक्की पहा..
![Have you ever seen a petrol pump built on the 5th floor](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/petrol-pump-Chongqing-China-780x470.jpg)
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका इमारतीच्या ५व्या मजल्यावर पेट्रोल पंप बनवण्यात आला आहे. साधारणपणे पेट्रोल पंप जमिनीवर बांधले जातात. मात्र, इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओने सर्वांनाच धक्का दिला आहे. हा विचित्र पराक्रम आपला शेजारील देश चीनच्या चोंगकिंग येथील असल्याचे सांगितले जात आहे.
या व्हिडिओ मध्ये इमारतीचा पुढचा भाग अगदी खालपासून सुरू होत असून पुढच्या भागात एक रस्ता जात आहे, तर इमारतीच्या मागील बाजूने जाणारा दुसरा रस्ता इमारतीच्या ५व्या मजल्याच्या पृष्ठभागाएवढा आहे.
हेही वाचा – ‘उद्धव ठाकरेंचा आदेश, राऊत म्हणाले, मनोहर जोशींचं घर जाळून टाका’; सदा सरवणकर यांचा मोठा आरोप
Refueling on the rooftop of a parking lot and subway passing through a residential building in the city of Chongqing, China. pic.twitter.com/gKZpbUA9wn
— Tansu YEĞEN (@TansuYegen) September 2, 2023
म्हणजे जो कोणी पेट्रोल भरायला येईल तो बिल्डिंगच्या मागच्या बाजूने येईल, कारण त्या भागात मुख्य रस्ता आहे. ही इमारत पाहता केवळ वाहने पार्किंग करण्याच्या उद्देशाने ही इमारत बांधण्यात आल्याचे दिसते. तर त्याचे छत पेट्रोल पंपात रूपांतरित केले आहे, जेणेकरून जागेचा योग्य वापर करता येईल.