गुजरातच्या भाटपोर गावात 90% पेक्षा जास्त प्रेमविवाह
तीन दशकांपासून चालत असलेली ही परंपरा गावाच्या संस्कृतीचा भाग बनली आहे.

भाटपोर : भारतीय समाजात लग्न ही एक पवित्र गोष्ट मानल्या जाते. खासकरून आईवडिलांच्या मर्जीने मुलांची लग्न लावण्याची प्रथा भारतात आहे. भारतात लव्ह मॅरेज होतात. पण ती प्रथा म्हणून अजूनही स्वीकारली गेली नाही. शिवाय लव्ह मॅरेजचं प्रमाण अत्यंत कमी आहे. पण महाराष्ट्रापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुजरातमध्ये मात्र लव्ह मॅरेजची अनोखी प्रथा आहे. गुजरातच्या भाटपोर गावातील लोकांची विचारसरणी काही औरच आहे. या गावातील 90 टक्क्याहून अधिक लोक प्रेम विवाह करतात. लव्ह मॅरेजची ही परंपरा गेल्या तीन दशकापासून या गावात सुरू आहे. लव्ह मॅरेजचं गाव म्हणूनच हे गाव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.
भाटपोर गाव सुरतच्या जवळ आहे. या ठिकाणी जवळपास 90 टक्के विवाह गावातच होतात. या गावातील लोक आपला जीवनसाथी स्वत: निवडतात. जोडीदार निवडीचं हे स्वातंत्र्य या गावालाही मान्य आहे. गावातील तरुण आपल्या कुटुंबाच्या सहमतीने विवाह करतात. विशेष म्हणजे या लव्ह मॅरेजच्या परंपरेला गावातील बुजुर्गांचाही पाठिंबा असतो. कुठूनही विरोधाचा सूर येत नाही. कारण या गावातील आजी-आजोबांनीही लव्ह मॅरेज केलेलं आहे. त्याममुळे त्यांना लव्ह मॅरेजबद्दल काहीच वावगं वाटत नाही.
गावातल्या गावातच सोयरीक
लव्ह मॅरेजची ही परंपरा गावातील अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आपल्याच गावातील मुला मुलींना गावातच प्रेम विवाह करण्याची आमच्या गावची परंपरा आहे. ही परंपरा आजकालची नाही. गेल्या दोन तीन पिढ्यांपासूनची ही परंपरा आहे. आम्हाला या परंपरेचा अभिमान आहे. गावातील बुजुर्गही या परंपरेला पूर्ण पाठिंबा देत आहेत. ही पंरपरा निव्वळ परंपरा नाही, तर ही आमच्या गावची ओळख आहे, असं या गावातील बुजुर्गांचं म्हणणं आहे. तसेच या गावातील लोक गावाच्या बाहेर लग्न करत नाही. म्हणजे बाहेरच्या गावातील मुला किंवा मुलीशी लग्न करत नाहीत. आपल्याच गावातील मुला, मुलींशी विवाह करतात.
हेही वाचा : महाशिवरात्रीनिमित्त आयोजित त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध
ट्रेंड नाही, परंपरा
भाटपोर गावातील लव्ह मॅरेज हा एक ट्रेंड नाहीये. ही एक परंपरा बनललेली आहे. प्रेमातून निर्माण झालेलं नातं अत्यंत मजबूत असतं असं या गावातील लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळेच या गावातील लोक आपला जीवन साथी स्वत: निवडतात. या गावातील होणारी लग्नही इतर गावांपेक्षा वेगळीच असतात. कारण लव्ह मॅरेजच्या निर्णयात घरातील लोक हस्तक्षेप करत नाही. त्यांना तशी गरजही पडत नाही.
या शिवाय गावातील लोक नात्याला पूर्णपणे स्वतंत्रपणे पाहतात. मुलगा आणि मुलगी जर एकमेकांना पसंत करत असतील तर ते लग्न करण्यासाठी स्वतंत्र आहेत, असं कुटुंबाचं म्हणणं असतं. या गावातील बुजुर्ग सुद्धा आपली मुलं आणि नातवांच्या निर्णयावर विश्वास ठेवतात. त्यामुळेच नाती मजबूत असतात. परिणामी घटस्फोट घेण्याचं आणि महिलांवरील अत्याचाराचं प्रमाणही अत्यंत कमी आहे.
भारतात सर्वाधिक लोक अरेंज मॅरेजवर विश्वास ठेवतात. अरेंज मॅरेज त्यांना योग्य वाटतं. पण भाटपोर गावातील उदाहरण वेगळंच आहे. या गावातील पंरपरा आणि संस्कृती जरा हटकेच आहे. गावातील लोक ही परंपरा अभिमानाने निभावत असतात. तसेच येणाऱ्या पिढ्यांनाही या परंपरेत प्रोत्साहन देतात.