breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी
सोन्याचे दर घसरले; जाणून घ्या नवीन दर
Gold Silver Rate Today | सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणारांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. अक्षय तृतीयेचा सण जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सध्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात १४५० रुपयांची घसरण झाली आहे.
हेही वाचा – ‘माझ्या आईनं देशासाठी मंगळसुत्र कुर्बान केलंय’; प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
सध्या सराफा बाजारात सोन्याचा दर हा ७२,२०० रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात सोनं ७०००० रुपयापर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.